जाहिरात
गडचिरोलीभ्रष्टाचार

आलापल्ली वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी बोगस मजुरांच्या नावाने लाखो रुपयांची केली अफरातफर

मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर योगाजी कुडवे यांचे आंदोलन सुरू, कंत्राटदार संघटनेचा पाठिंबा

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,९ ऑगस्ट)
संपादक : संदिप कांबळे

आलापल्ली वनविभागाअंतर्गत येत असलेल्या आलापल्ली वनपरिक्षेत्र कार्यालय क्षेत्रात करण्यात आलेल्या एकूण कामासह खरेदी व्यवहाराची चौकशी समितीअंतर्गत चौकशी करुन दोषी अधिका-यांवर तत्काळ कारवाई करण्याच्या मागणीला घेऊन अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष योगाजी कुडवे यांच्या नेतृत्वात बुधवार, ९ ऑगस्टपासून मुख्य वनसंरक्षक कार्यालय गडचिरोलीसमोर बेमुदत आंदोलन सुरू केले आहे.

मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनाला कंत्राटदार संघटनेने सुद्धा पाठिंबा दिलेला आहे,आलापल्ली परिक्षेत्रात काम करणाऱ्या कंत्राटदारांनी कामाच्या परवानगीचे प्रती किलोमीटर ला १ लाख रुपये याप्रमाणे संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश शेरेकर यांना पैसे दिल्याची यावेळेस कबुली सुद्धा दिलेली आहे. यात सहभागी प्रणय खुणे, शंकर ढोलके, मोरेश्वर कुनघाडकर, मंगेश देशमुख, संजय कुंनघाडकर, रोशन आखाडे यांनी पाठिंबा दर्शविला आहे.

वन विभागात काम करणाऱ्या प्रती मजुराचे ४५ दिवस कामाचे निघाले ८० हजार रुपये
¶¶¶
आज पासून मुख्य संरक्षक कार्यालय गडचिरोली येथे सुरू असलेल्या आंदोलनात आंदोलनकर्त्यांनी पत्रकारांना झालेल्या भ्रष्टाचाराची पुरेपूर दस्तऐवजा सह माहिती दिली. ज्यात मजूर वर्ग ४५ दिवस काम केला अन त्याची मजुरी निघाली ८० हजार रुपये अशा मोठा भ्रष्टाचार झाल्याचे दिसते.तसेच दोन नावांची एकच सही करून पैसे काढल्याचे पण निदर्शनास येते. तसेच पुणे, मुंबईत शिक्षण घेणाऱ्या मुलांचे नावाने सुद्धा सही करून त्यांच्या नावाचे वाऊचर ने पैसे काढल्याचे सुद्धा निदर्शनास येते.

श्री.रमेश कुमार
मुख्य वनसंरक्षक,गडचिरोली
¶¶¶¶
सदर प्रकरणी तीन सदस्यिय समिती गठित केलेली आहे, त्यांचा अहवाल आला की लगेच दोषींवर कारवाई केली जाईल अशी माहिती ‘लोकशाही न्यूज’ ला माहिती दिली.

योगाजी कुडवे
जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय सरपंच परिषद, गडचिरोली
¶¶¶
जोपर्यंत वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश शेरेकर, वनपाल, वनसंरक्षक व इतर दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button