जाहिरात
गडचिरोलीब्रेकिंग न्युज

वाघाच्या हल्ल्यात आणखी एकाचा बळी, वन विभागाच्या सूचनांकडे जनतेचे दुर्लक्ष

Spread the love

गडचिरोली (दि,२६ जुलै)
गडचिरोली मुख्यालयापासून ८ किलोमीटर दूर दिभना या गावी जंगलात गुरे चारण्यासाठी गेलेल्या इसमावर झालेल्या हल्ल्यात निलकंठ गोपाळा मोहूर्ले ( वय ५५) या इसमाचा बळी गेला.वाघाच्या हल्ल्यात मृत झालेली व्यक्ती ही जंगलात आपल्या इतर सहकाऱ्यांसोबत गुरे चराई साठी गेली असताना जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला चढविला व त्याचा जीव घेतला.

सदर मृत व्यक्तीच्या मागे पत्नी,२ मुलं,२ सुना व ४ नातवंड आहेत .

वनविभाग व पोलिस प्रशासनाच्या मदतीने सदर मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्याकरिता गडचिरोली सामान्य रुग्णालय येथे आणण्यात आले आहे .

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button