जाहिरात
Uncategorizedगडचिरोलीविशेष

गडचिरोली प्रेस क्लब च्या अध्यक्षपदी नंदकिशोर काथवटे व सचिवपदी निलेश पटले यांची निवड

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,३० डिसेंम्बर) 

गडचिरोली प्रेस क्लब च्या अध्यक्षपदी दैनिक तरूण चे जिल्हा प्रतिनिधी श्री नंदकिशोर काथवटे तर सचिवपदी दैनिक लोकशाही वार्ता चे जिल्हा प्रतिनिधी श्री निलेश पटले यांची सर्वांनुमते अविरोध निवड करण्यात आली.

(गडचिरोली प्रेस क्लब चे अध्यक्षपदी नंदकिशोर काथवटे यांची निवड)

(गडचिरोली प्रेस क्लबच्या सचिव पदी निलेश पटले)

गडचिरोली प्रेस क्लब ची वार्षिक आमसभा काल बुधवारी प्रेस क्लब च्या पत्रकार भवनात अध्यक्ष श्री मनोज ताजणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. श्री ताजणे यांनी सन २०२२ मधील आपल्या कार्याचा आढावा सादर केला. त्यांच्या कार्याबद्दल सर्व सदस्यांनी समाधान व्यक्त केले. गडचिरोली प्रेस क्लब ची २०२३ ची कार्यकारीणी खालीलप्रमाणे सर्वांनुमते अविरोध निवडण्यात आली. अध्यक्ष- नंदकिशोर काथवटे, सचिव – निलेश पटले, उपाध्यक्ष – शेमदेव चाफले, सहसचिव – अरविंद खोब्रागडे कोषाध्यक्ष – अविनाश भांडेकर, सदस्य – सुरेश पद्मशाली, रोहिदास राऊत, अनिल धामोडे, रूपराज वाकोडे, सुरेश नगराळे, विलास दशमुखे, मनोज ताजणे, मिलींद उमरे. आभार प्रदर्शन मिलींद उमरे यांनी केले

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button