जाहिरात
गडचिरोली

गडचिरोली पं. स. आमसभा विविध विषयावर गाजली,सभेला अधिकाऱ्यांची गैरहजेरी

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली ( दि,२२फेब्रुवारी)

गडचिरोली पंचायत समितीची वार्षिक आमसभा दिनांक २२ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद हायस्कूल च्या सभागृहात आमदार डॉ. देवराव होळी यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. यावेळी मंचावर साळवे गटविकास अधिकारी पंचायत समिती गडचिरोली , माजी सभापती विलास दशमुखे, हेमंत बोरकुटे यांची हजेरी होती .

आमसभेला गैरहजर असणाऱ्या कार्यालयावर काय कारवाई करणार याकडे लक्ष
¶¶¶¶
वार्षिक सभेला जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी नगरपरिषद गडचिरोली, उपविभागीय अधिकारी गडचिरोली, तहसीलदार गडचिरोली, मंडळ अधिकारी कार्यालय गडचिरोली, गटशिक्षणाधिकारी गडचिरोली, वनपरिक्षेत्र अधिकारी गडचिरोली, भुमी अभिलेख अधिकारी अशा कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी तसेच गडचिरोली साजा क्रमांक चे तलाठी चे कर्मचारी गैरहजर होते. डॉ. देवराव होळी यांचे आपल्या विधानसभा क्षेत्रात कुठेही वचक नाही हे दिसून येते. जर अधिकारी कर्मचारी वर्ग वार्षिक आमसभेलाच हजर राहत नसेल तर वर्षभरामध्ये कार्यालयात काय दिवे लावत असतील यावरून दिसून येते.

वार्षिक आमसभा सुरू असताना जेष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्ती मुकुंदराव उंदीरवाडे यांनी सुरू कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो लावली नाही म्हणून कार्यक्रम मध्येच रोखला व आयोजकांना डॉ. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आमसभेला फोटो न लावणाऱ्या आयोजकावर गुन्ह्याची नोंद करण्याची मागणी केली .

खालील विषयांवर रंगली चर्चा
¶¶¶¶¶
दवाखाना, आरोग्य केंद्र, आरोग्यउपकेंद्र, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग,जलसंधारण, धडक सिंचन विहीर, मामा तलाव, शालेय पोषण, घरकुल, शेतीपंपाचे वीज मीटर, स्वच्छ भारत मिशन, अशा अनेक प्रश्नांवर या वार्षिक आमसभेत चर्चा करण्यात आली सर्व प्रश्न सात दिवसाच्या आत निकाली काढावे असे सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या.

(वार्षिक आमसभेला लोकांची उपस्थिती )

आमदार डॉ.देवराव होळी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम कसाबसा पार पाडून, तक्रारी घेऊन आलेल्या लोकांना पिवळामसाला भात वाटप करण्यात आला. यालाच म्हणायची का आमदाराची वार्षिक आमसभा असा प्रश्न सभेला आलेल्या गडचिरोलीकरांनी यावेळी लोकशाही न्यूज प्रतिनिधी जवळ व्यक्त केला.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button