जाहिरात
राजकीय

माजी नगराध्यक्ष योगीता पिपरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,८ जुलै)

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या जिल्हा प्रभारी तथा गडचिरोली शहराच्या माजी नगराध्यक्ष योगीता पिपरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज ८ जुलै रोजी गडचिरोली शहरातील इंदिरानगर येथील निर्मल विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप व वृक्षारोपण इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करून साजरा करण्यात आला. याप्रसंगी सर्वप्रथम माजी नगराध्यक्ष योगीता पिपरे यांच्या वाढदिवसा निमित्य त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

त्यानंतर विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे व खाऊचे वाटप तसेच शालेय गणवेश चे वाटप योगीता पिपरे व भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर वाढदिवसाचे औचित्य साधून शाळा परिसरात योगीता पिपरे, प्रमोद पिपरे व प्रमुख पदाधिकाऱ्यांचा हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

याप्रसंगी महिला आघाडी च्या जिल्हा सचिव प्रतिभा चौधरी, शहर अध्यक्ष कविता उरकुडे, माजी नगरसेविका लता लाटकर, नीता उंदिरवाडे, भाजपचे शहर महामंत्री विनोद देवोजवार, केशव निंबोड, दलित आघाडी चे शहर अध्यक्ष प्रा. उराडे सर, शहर उपाध्यक्ष विवेक बैस, भाजयुमो चे राजु शेरखी, नरेश हजारे, देवाजी लाटकर, महिला आघाडी शहर उपाध्यक्ष कोमल बारसागडे, नीता बैस, अर्चना चन्नावार, शाळेच्या मुख्याध्यापिका सुषमा वासेकर, शिक्षिका सोनाली सुरणकर, शिक्षिका करीना तटलावार उपस्थित होत्या.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button