तेली समाजातील ३६ गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न, संताजी सोशल मंडळ चा पुढाकार

लोकशाही न्युज,गडचिरोली (९जुलै)
संताजी सोशल मंडळ गडचिरोली च्या वतीने १० वी व १२ वी तील गुणवंत विद्यार्थी तसेच एम.पी.एस.सी.,यु.पी.एस.सी.,
पी.एच. डी., एम.बी.बी.एस व नवोदय पूर्व परीक्षा व स्कॉलरशिप उत्तीर्ण झालेल्या अश्या एकूण ३६ विद्यार्थी व विद्यार्थ्यांनीचा सत्कार सोहळा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात पार पडला. गुणवंत विद्यार्थ्यांना शिल्ड व प्रमाणपत्राचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून मान्यवरांच्या शुभहस्ते कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. देवानंद कामडी अध्यक्ष संताजी सोशल मंडळ गडचिरोली हे होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उमेश कोराम विद्यार्थी युवा नेते, विद्यार्थी समाज महासंघ नागपूर हे होते, प्रमुख अतिथी म्हणून अविनाश भांडेकर जिल्हा प्रतिनिधी दैनिक पुण्यनगरी गडचिरोली हे होते. तसेच कार्यक्रमाचे सचिव म्हणून गोपीनाथ चांदेवार संताजी सोशल मंडळ गडचिरोली हे होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोपीनाथ चांदेवार यांनी केले, त्यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात २०१२ ला स्थापन झालेल्या संताजी सोशल मंडळाची महती सांगितली त्याचप्रमाणे करीत असलेले उपक्रम व भविष्यात काय उपक्रम करणार याविषयीची माहिती दिली.
गुणवंतांच्या सत्कार सोहळ्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले उमेश कोराम विद्यार्थी युवा नेते, विद्यार्थी तेली समाज महासंघ नागपूर यांनी, आवडीच्या क्षेत्रात करिअर करा तसेच परिस्थितीवर मात करून आपल्याला शिक्षण कसा घेता येईल त्यासोबतच महा ज्योती नावाच्या योजने संदर्भात विद्यार्थ्यांना परिपूर्ण माहिती देऊन जागृत करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले अविनाश भांडेकर जिल्हा प्रतिनिधी पुण्यनगरी यांनी आपल्या संभाषणात शिक्षण घेत असताना अपयश आल्यानंतर खचून न जाता त्याच्यावर मात करून पुढील शिक्षण कसा घेता येईल व आपले करिअर कसे घडवता येईल यावर मार्गदर्शन केले. तसेच आजच्या डिजिटल युगात आपण पत्रकारिता या क्षेत्रात पण करिअर करू शकता असे सांगितले.
कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे यांनी विद्यार्थ्यांना आपआपल्या क्षेत्रात आपल्या घरच्या परिस्थितीनुसार शिक्षण घेऊन करिअर करण्या संदर्भात मार्गदर्शन केले.
गुणवंतांच्या सत्कार सोहळ्यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले देवानंद कामडी यांनी जिद्द कायम ठेवून अभ्यास करा व आपले ध्येय निश्चित करून आपल्या जीवनाची पुढील दिशा ठरवा. एक वेळ उपाशी रहा पण शिक्षणापासून वंचित राहू नका असा मौलिक सल्ला सुद्धा यावेळी अध्यक्ष स्थानावरून देवानंद कामडी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संताजी सोशल मंडळाचे सभासद रामदास कुनघाडकर, राजेश इटनकर, प्रभाकर वासेकर, सुरेश भांडेकर, सुरेश निंबोरकर, सुधाकर लाकडे, हेमंत खोब्रागडे, विष्णूजी कांबळे, प्रमोद पिपरे, विठ्ठलराव कोठारे आदींची उपस्थिती होती तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचे आई-वडील सुद्धा आवर्जून हजर होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामराज करकाळे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन लाकडे सर यांनी केले
