जाहिरात
विशेष

स्थानिक इंदिरा गांधी चौकाचे नामांतरण ! काँग्रेस पदाधिकारी गप्प का, भाजपाच्या लोकप्रतिनिधींची खेळी असल्याची चर्चा .

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,२० जून)

गडचिरोली शहरातील एकमेव मुख्य चौक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदिरा गांधी चौकाचे नामांतरण झाल्याची चर्चा संपूर्ण शहरात पसरलेली आहे, सदर इंदिरा गांधी चौकात इंदिरा गांधी चा कोणत्याही प्रकारचा नामशेष न ठेवता मुख्याधिकारी
नगरपालिका प्रशासनाने वेगळीच शोभेची वस्तू चौकाच्या ठिकाणी लावलेली आहे. त्यामुळे आता स्थानिक इंदिरा गांधी चौकाचे नामांतरण झाल्याची चर्चा संपूर्ण शहरात पसरली असून नागरिकांमध्ये, सच्चे गांधीवादी लोकांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे मुख्याधिकार्‍याने कोणत्याही प्रकारची विचारपूस न करता परस्पर आपल्या मताने चौक सुधारणाकरिता निविदा काढून वेगळ्याच प्रकारची शोभेची वस्तू स्थानिक इंदिरा गांधी चौकात लावण्यात आलेली आहे, ज्याचा संबंध कोणत्याही प्रकारे गडचिरोली जिल्ह्याचा वारसा दाखवणारा नाही त्यामुळे मुख्याधिकारी यांच्यावर जनतेचा असंतोष पसरला असल्याचे दिसून येत आहे मात्र हा सर्व खेळ काँग्रेस पक्ष डोळझाकपणे पाहत असल्याची ही चर्चा आहे.

गेल्या अनेक दशकांपासून त्या चौकाला इंदिरा गांधी चौक असे संबोधले जात होते मात्र येणाऱ्या पिढीला सदर चौकात वेगळ्या प्रकारचे शोभेची वस्तू दिसल्यामुळे स्थानिक इंदिरा गांधी चौकाचे विसर पडणार आहे त्यामुळे स्थानिक इंदिरा गांधी चौकाचे नामांतरण झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी याबाबतचा विरोध देखील केला नाही एकीकडे गांधीवादी आणि गांधी परिवाराशी जोडून काँग्रेस पक्ष आम्ही चालवणार असे मोठे मोठे जुमलेबाजी करतात मात्र स्थानिक इंदिरा गांधी चौकाचे नाव बदलून मुख्याधिकाऱ्याने परस्पर एक वेगळ्या प्रकारची झाकी लावली आहे मात्र याबाबत कोणत्याही काँग्रेस पदाधिकाऱ्याला विसर पडल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे नेमकी सत्तेसाठी गांधी परिवार मात्र असल्याचे चित्र दिसून येत आहे.

याआधी देखील गडचिरोलीत येथील कारगिल चौकाचे सौंदर्यीकरण करण्यात आले मात्र तत्कालीन सीईओ मुख्याधिकारी वाघ यांनी कारगिल चौकाचे कारगिल ची प्रतिमा लावून कारगिल चौकाचे सोंदर्यीकरण केले त्यामुळे सदर कारगिल चौक हे कारगिल चौक म्हणूनच संबोधले जाऊ लागले.

मात्र इथे असं नसून स्थानिक इंदिरा गांधी चौकांचे नाव बदलण्याकरिता स्थानिक खासदार, आमदार भाजपाचे यांच्या दबावाखाली केल्याची देखील चर्चा रंगत आलेली आहे एकीकडे संपूर्ण देशात नामांतरणाबाबत मोठा लढा दिला जातो मात्र गडचिरोली जिल्ह्यात अनेक दशकापासून गडचिरोली जिल्ह्याच्या निर्मितीपासून संबोधल्या जाणाऱ्या स्थानिक इंदिरा गांधी चौकाचे नामांतरण झाल्याचे दिसून येत असले तरी काँग्रेसचे लोकप्रतिनिधी, प्रतिनिधी, पदाधिकारी चुप का असा सवाल आता उपस्थित झालेला आहे.

सतीश विधाते
(माजी नगरसेवक तथा शहर अध्यक्ष काँग्रेस पार्टी गडचिरोली)
¶¶¶¶
इंदिरा गांधी चौक हे नाव त्या चौकाला दिलेले असून नगरपरिषद प्रशासनाचे जर त्या चौकाचे नामांतरण केल्यास काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र विरोध करण्यात येईल. अशी भूमिका लोकशाही न्यूज ला दिलेल्या प्रतिक्रियेत सतीश विधाते यांनी दिली आहे.

सूर्यकांत पिद्दूरकर (मुख्याधिकारी नगर परिषद गडचिरोली)
¶¶¶¶
सदर इंदिरा गांधी चौकातील कलाकृती ही स्वागतम करणारी आहे व त्या ठिकाणी आपण कुठल्याही थोर महापुरुषाचा पुतळा उभारू शकत नाही, नवीन पुतळा धोरण नियमानुसार ती हायवे पासून १२ मीटर अंतरावर उभारल्या जाते म्हणून ती कलाकृती लावलेली आहे.
चौकाचे नाव बदलले जाणार आहे ही केवळ अफवा आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button