जाहिरात
ताज्या घडामोडी

कंत्राटी कर्मचाऱ्याचा विद्युत शॉक लागुन मृत्यू

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (२० जून )

गडचिरोली मुख्यालयापासून अवघ्या १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या येवली परिसरातील दर्शनी माल येथे विद्युत खांबावर चढून काम करीत असतांना शॉक लागल्याने कंत्राटी विद्युत कर्मचाऱ्याचा खांबावरच मृत्यू झाल्याची घटना सोमवार १९ जून रोजी सकाळी घडली.

मृतकाचे नाव वैभव जेंगठे (वय २२ वर्ष) रा. मंगरमेंढा ता. ब्रह्मपुरी जि. चंद्रपूर असून मृतक हा आई वडिलांना एकुलता एक मुलगा असल्याने कुटुंबाचा आधार हरवला असल्याने जेंगठे परिवारावर शोककळा पसरली आहे, व त्याच्या अश्या निघून जाण्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मृतकाचे शव जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे शवविच्छेदनासाठी नेले असून शवविच्छेदनानंतर त्या शवावर अंतिम संस्कार त्याच्या राहत्या गावी मंगरमेंढा येथे करण्यात येणार आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button