गडचिरोली शहरातील प्रसिद्ध पेंटर युवराज बेहरे यांचे अपघाती निधन,पत्नी व चालक जखमी

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,१८ जून)
गडचिरोली जिल्ह्यात व शहरात प्रसिद्ध असे रांगोळी पेंटर युवराज व्यंकट बेहेरे रा.चामोर्शी रोड, कन्नमवार नगर, गडचिरोली यांचे काल नागपूर -अमरावती महामार्गावर कोंढाळी जवळ पहाटे ४ वाजता अपघातात निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ५० वर्षे होते. त्यांच्या पत्नी विभा बेहरे (वय ४५) व चालक ऋषी बोरकुटे रा.काटली जि. गडचिरोली वय ३० हे गंभीर जखमी आहेत. नागपूर येथील खाजगी इस्पितळात भरती आहेत .
त्यांच्या मृत्यूपश्चात २ मुलं व बराच मोठा आप्त परिवार आहे त्यांच्या अपघाती निधनाने बेहरे परिवारावर शोककळा पसरली आहे. तसेच गडचिरोली शहरावर शोककळा पसरली आहे .

(अपघातात चेंदामेंदा झालेली हीच ती कार)
मृतक युवराज बेहरे हे आपल्या मित्राच्या व आपल्या परिवारासोबत दोन वाहनाने महाराष्ट्र दर्शन करिता गेले होते.ते काल शेगाव चे दर्शन करून परतीच्या प्रवासात MH- 34-V-3429 या कारने अपघात झाला.
त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी ८ वाजता कठानी नदीवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
असा कलाकार पुन्हा होणे नाही.
¶¶¶
गडचिरोली जिल्ह्यात व शहरात कुठेही लग्न कार्यक्रम असो किंवा राजकीय कार्यक्रम असो, कुठलाही सोहळा असो युवराज बेहरे यांना लोक आवर्जून रांगोळी काढायला बोलवायचे आजपर्यंत त्यांना हजारो रांगोळ्या आपल्या केलेने सादर केल्या होत्या. त्यामुळे त्यांची गडचिरोली जिल्ह्यात ओळख निर्माण झाली होती. त्यांच्या अपघाती निधनाने गडचिरोली शहरावर शोककळा पसरली आहे.
