जाहिरात
दैनंदिन बातम्या

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणा-या नराधमांना फाशीची शिक्षा द्या,वंचित बहुजन आघाडीची मागणी

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली(दि,१४ जून)
महाराष्ट्रात दिवसेंदिवस महिलांवर अन्याय, अत्याचार व बलात्काराच्या घटनात वाढ होत आहे, या घटणा रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरले असल्याने विकृतांवर कायद्याचे वचक नसल्यामूळे आलापल्ली सारख्या ठिकाणी अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या घटना घडत आहेत याला पूर्णपणे राज्य सरकार कारणीभूत आहे त्यामूळे राज्य सरकारच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतिने येथिल इंदिरा गांधी चौकात तिव्र निदर्शने करण्यात आले व आलापल्लीत अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणा-यां नराधमांचा जाहिर निषेध करून अशा नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

(स्थानिक इंदिरा गांधी चौकात वंचित बहुजन आघाडी तर्फे नराधमांना फाशीची शिक्षा देणे करिता तीव्र निदर्शन व आंदोलन)

आलापल्ली येथे वर्ग दहावीची मार्कलिस्ट आणण्यासाठी गेलेल्या आदिवासी अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी बलात्कार केला ही घटना मानवतेला काळीमा फासणारी व अत्यंत निंदणीय कलंकीत असतांना सुद्धा आदिवासीच्या आरक्षणावर निवडून आलेल्या आमदार व खासदारांनी कोणतीही प्रतिक्रीया दिली नाही, अत्याचारग्रस्त मुलीला साधी भेट देऊन सांत्वन सुद्धा केले नाही त्यामूळे जनतेच्या मनात प्रचंड राग, चिड, आक्रोश आहे त्यामूळे जिल्ह्यातील आमदार व खासदारांचा सुध्दा निषेध करण्यात आला.
निदर्शने करणा-या कार्यकर्त्यांनी राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात नारेबाजी केल्यामुळे इंदिरा गांधी परिसर दणाणून गेला, सदर खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, बाल लैंगीक कायद्यासह ऑक्ट्रासिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

निदर्शने आंदोलनात जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे, उपाध्यक्ष जी के बारसिंगे, तालुकाध्यक्ष बाशीद शेख, महिला आघाडीच्या मालाताई भजगवळी , मिडीया प्रमुख जावेद शेख , निरद सावळे, कवडू दुधे, प्रफुल मेश्राम, शोभा शेरकी, तेजराव नेतनकर, गजानन मेश्राम , वंदना येडमे, सुजाता जुरेसिया, सुजाता वासनिक, प्रशिक रामटेके, शकुंतला दुधे, डिंपल खंडागळे, श्वेता बोरकर आदिंसह शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येेने उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button