जाहिरात
अपघात

ट्रक च्या धडकेत शिक्षिका ठार

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. १० डिसेंबर)

आज सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास आपल्या दुचाकी वाहणाने शाळेत जात असताना
बी फॅशन मॉल च्या समोर गडचिरोली -चंद्रपूर रोडवर स्कुटी गाडी स्लीप होऊन खाली पडल्या. व शेजारून जात असलेल्या आयशर टेम्पोच्या पाठीमागच्या चाकाखाली येऊन डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने, त्यांना शासकीय वाहनाने जिल्हा सामान्य रुग्णालय भरती केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

मृतक ह्या कारमेल शाळेच्या शिक्षिका कु. ममता बांबोळे वय ४३ रा.आयटीआय- गोकुळनगर बायपास रोड येथील होत्या.त्यांच्या मृत्यूने बांबोळे कुटुंबीयावर शोककळा पसरली आहे.

गडचिरोली वासीयांची रिंग रोडची मागणी
!!
गडचिरोली शहरातून चारही दिशेने जाणारे जड वाहने हे इंदिरा गांधी चौकातूनच जातात. परिणामी अशा एक ना अनेक अपघातामुळे अनेकांचा जीव जातो. त्यामुळे जड वाहनांसाठी गडचिरोली शहरा बाहेरून रिंग रोड लवकरात लवकर तयार करावा अशी मागणी गडचिरोली करांनी केली आहे. जेणेकरून शहरात होणाऱ्या अपघाताला आळा बसेल.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button