३६ वर्षीय महिलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा द्या
गीता हिंगे यांची पत्रकार परिषदेतून मागणी

लोकशाही न्युज, कुरखेडा (दि.२६ फेब्रुवारी)
कुरखेडा तालुक्यातील चिखली या गावातील महिला घरी एकट्याचे साधून आरोपी अनिल लक्ष्मण मच्छिरके वय-३८ ने त्या महिलेवर बलात्कार केला बलात्कार पीडित महिलेचे वय ३६ वर्षे असून तिला १४ वर्षाचा मुलगा व १२ वर्षाची मुलगी आहे त्या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी व त्या आरोपीला जामीन मिळू नये अशी मागणी आधार विश्व फाउंडेशनच्या अध्यक्ष तथा भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष गीता हिंगे यांनी दि.२५ फेब्रुवारी ला झालेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे.
कुरखेडा तालुक्यात चिखली या गावी दि.१८ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली.कुरखेडा पोलिस विभागाने पीडित महिलेच्या तक्रारीवर आरोपीला जेरबंद केले.दि.२४ फेब्रुवारी रोज सोमवारला महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष गीता हिंगे या आपल्या महिला टीम ला घेऊन चिखली या गावात पोहोचल्या तेव्हा पीडित महिलेवर प्रकरण मागे घेण्यासाठी दबाव येत असल्याची माहिती मिळाली.पोलीस तपासातून निष्पक्ष तपास करून सदर आरोपीला कठोर शिक्षा व्हावी व बलात्कार पिडीत महिलेला न्याय मिळावा अशी ही मागणी या माध्यमातून करण्यात आली.
पत्रकार परिषदेला वर्षा शेडमाके,सीमा कन्नमवार,रुपाली कावळे,रेखा उईके, अल्का पोहणकर,भूमिका बरडे , पायल कोडापे, भारती खोब्रागडे,कोमल बारसागडे ,अंजली देशमुख उपस्थित होत्या.
