अमिर्झा ग्रामपंचायतचे सरपंच व सदस्य ४ हजार रुपयाची लाच घेताना ए सी बी च्या सापळ्यात

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,११ एप्रिल)
गडचिरोली शहरापासून अवघ्या २० किलोमीटर अंतरावर असलेल्या अमिर्झा या गावात तकारदार यांना अमिर्झा ते अमिर्झा टोली येथील गटारे उपासण्याचे व ट्रॅक्टरने मलबा फेकण्याचे कामाचे चेकवर सही करुन देण्याचे कामाकरीता ग्रा.पं. अमिर्झा येथील सरपंच श्रीमती सोनाली गोकुलदास नागापूरे वय ३२ सरपंच व श्री अजय भास्कर नागापूरे वय ४० ग्रामपंचायत सदस्य यांनी ५ हजार रुपये लाच रक्कमेची पंचसाक्षीदारा समक्ष मागणी करुन तडजोडीअंती ४ हजार रुपये लाच रक्कम मौजा अमिर्झा येथे सरपंच सौ. नागापुरे यांचे घरी स्विकारतांना रंगेहाथ सापळा रचून पकळण्यात आले.
सदर दोन्ही आरोपी विरुद्ध गडचिरोली पोलीस ठाणे व कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
सदर कारवाई पोलीस उपअधिक्षक अनिल लोखंडे यांचे पर्यवेक्षणात पो.नि. श्रीधर भोसले, सफी प्रमोद ढोरे, पोहवा नथ्यु धोटे, नापोशि राजु पदमगिरीवार, श्रीनिवास संगोजी, किशोर जीजारकर, स्वप्नील बांबोळे, पोशि संदीप घोरमोडे, किशोर ठाकुर, संदिप उडाण, मपोशि विद्या म्हशाखेत्री, जोत्सना वसाके, चापोहवा तुळशीराम नवघरे सर्व ला.प्र. विभाग गडचिरोली यांच्या हाताखाली कारवाई करण्यात आली .
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे आव्हान,
¶¶¶¶
शासकीय कामे करीत असताना लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी कुणीही पैसे मागत असल्यास लाचलूचपत प्रतिबंधक विभागाला संपर्क साधावे .
