जाहिरात
गडचिरोली

गडचिरोली पोलीस दलातील मृत जवानांच्या कुटूंबियांना ॲक्सिस बँकेने दिला मदतीचा हात

पोलीस अधीक्षक निलोत्पल यांचे हस्ते १० लाख रुपयाचा धनादेश कुटुंबियांच्या स्वाधीन

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,१५ मार्च)

बँक म्हणेजे ग्राहकांचे पैसे सांभाळणारी किंवा त्यांना कर्ज देणारी यंत्रणा अशी नागरीकांमध्ये ओळख असुन एक पाऊल पुढे जात आपल्या खातेधारकांच्या जिवाला धोका निर्माण झाला तर त्यांच्या कुटुंबियांना आर्थीक आधार देण्याचा नवा आदर्श ॲक्सिस बँकेने ठेवला आहे.

दि, १५ ऑक्टोंबर २०२२ रोजी गडचिरोली पोलीस दलातील कार्यरत कर्मचारी शामराव वैरागडे हे कर्तव्यावर असतांना त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियावर मोठे संकट कोसळले. ही समस्या ओळखुन ऑक्सिस बँकेने मदतीचा हात पुढे करीत त्यांच्या पश्चात पत्नी श्रीमती छाया शामराव वैरागडे यांना आर्थीक मदत स्वरुपात पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे हस्ते १० लाख रुपयाचा धनादेश अदा करण्यात आला.

यावेळी पोलीस अधीक्षक नीलोत्पल ,अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता तसेच ॲक्सिस बँकेचे शाखा व्यवस्थापक, श्री राकेश राजेंद्र बल्लालवार यांचे उपस्थितीत मृत कर्मचा-यांच्या कुटुंबियांना धनादेश स्वाधीन करण्यात आला.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button