“आप” च्या वतीने उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांचे अटकेचा केला निषेध
लोकशाही न्युज,गडचिरोली(दि २७फेब्रुवारी)
आम आदमी पार्टी चे दिल्लीचे शिक्षामंत्री व उपमुख्यमंत्री श्री मनिष सिसोदिया यांना दिल्ली येथुन सिबीआय ने फर्जी गुन्हे लावुन बेकायदेशीर अटक केल्यानंतर, देशभरात संतापाची लाट उसळली आहे. आज संपुर्ण देशात आम आदमी पार्टी च्या वतीने केंद्र सरकार मोदी सरकार विरोधात निदर्शने आंदोलने करण्यात आले.
आज गडचिरोली जिल्हा आम आदमी पार्टी तर्फे सुध्दा आप कार्यकर्त्यांनी इंदिरा गांधी चौक गडचिरोली जिल्हा आप प्रमुख बाळकृष्ण सावसाकडे यांच्या नेतृत्वात एक सर्वश्रेष्ठ शिक्षा मंत्री यांनी देशाच्या लाखो विद्यार्थ्यांसाठी दिवस रात्र मेहनत करून त्यांचा भविष्य बनवण्याचे काम करीत आहे आम आदमी पार्टीच्या शिक्षा मॉडेल,स्वास्थ्य मॉडेल ला घाबरून शिक्षणमंत्री यांना अटक करण्यात आली या अटकेच्या निषेधार्थ केंद्र सरकार सी.बी.आई विरोधात तिव्र निषेध नोंदविला, निदर्शने केली , धरणे आंदोलन करण्यात आले.
तसेच केंद्र सरकारच्या मोदी- शहा सरकारच्या तानाशाही ‘दडपशा ही दबाव् तंत्र विरोधात मोदी शहा सरकार होश मे आवो. मोदी तेरी ताना शाही नही चलेगी,केंद्र सरकारचा धिक्कार असो,मोदी सरकार हाय हाय अशी घोषणाबाजी देण्यात आली.
याप्रसंगी गडचिरोली जिल्हा संयोजक श्री बाळकृष्ण सावसाकडे यांनी घोषणा देत यांनी आपले प्रखर विचार मांडले. याप्रसंगी गडचिरोली जिल्हा सचिव भास्कर इंगळे, कोषाध्यक्ष संजय जीवतोडे, जिल्हा महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी खरवडे, जिल्हा महिला सचिव सोनल ननावरे, महिला शहर प्रमुख समीता गेडाम, शहर सचिव संतोष कोटकर,शहर प्रमुख नामदेव पोले,संघटनमंत्री हितेंद्र गेडाम प्रीती लेनगुरे,खेमराज हस्ते,दिवाकर साखरे,प्रकाश शेंडे,प्रसाद खरवडे,प्रमोद वाटे ,शैलेश खांडेकर आदी कार्यकर्ते निदर्शनास उपस्थित होते.
