जाहिरात
अहमदनगर

अहमदनगरच्या गंगामाई साखर कारखान्यात भीषण स्फोट! कारखान्याचा मोठा भाग जळून खाक

Spread the love

लोकशाही न्युज,चिखली | मेघा जाधव (दि,२७ फेब्रुवारी)

अहमदनगर औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या गंगामाई कारखान्याच्या डीसलेरी विभागाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग अतिशय भीषण असल्याचे सांगितले जात आहे.
या आगीमध्ये कारखान्याचा मोठ्या प्रमाणात भाग जळून खाक झाल्याची माहिती समोर येत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पाथर्डी, शेवगाव, पैठण आणि अहमदनगर येथून ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाचे बंब रवाना झाले आहेत. कारखान्यापासून पाच किलोमीटरचा परिसर निर्मनुष्य करण्यासाठी प्रशासनाने तयारी केली असून त्यासाठी तहसीलदार आणि पोलीस प्रशासन यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button