जाहिरात
अहेरीनक्षली घडामोडी

पोलीस – नक्षल चकमकीत नक्षली साहित्य हस्तगत

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली, अहेरी (दि,१६ जानेवारी)

१५ जानेवारी रोजी उपविभाग अहेरी अंतर्गत येणाऱ्या उपपोस्टे पेरमिली हद्दीतील मौजा वेडमपल्ली जंगल परिसरात विशेष अभियान पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना दुपारी २ वाजता दरम्यान सदर जंगल परिसरात २० ते २५ अशा मोठ्या संख्येतील नक्षलवाद्यांनी पोलीस जवानांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने जवानांच्या दिशेने जोरदार गोळीबार केला. विशेष अभियान पथकांच्या बहादूर जवानांनी प्रतिउत्तरादाखल व स्वसंरक्षणासाठी नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला असता, जवानांचा वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत पळ काढला.

पोलिसांच्या कारवाईत हस्तगत साहित्य
👇👇
नक्षल चकमकीनंतर सदर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असता, त्यामध्ये ०१ नग भरमार, ०१ नग पिस्टल, ०१ नग वॉकीटॉकी चार्जर व इतर मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य हस्तगत करण्यात यश प्राप्त केले.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button