”आप “च्या वतीने कन्नमवार वॉर्ड येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी
लोकशाही न्युज,गडचिरोली (दि,४ जानेवारी)
गडचिरोली शहरातील स्थानिक कन्नमवार वार्ड येथे आम आदमी पार्टी जिल्हा गडचिरोली च्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानी वदंना कुठावार प्रमुख अतिथी म्हणून कुसूमताई खरवडे हे होते,
जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकडे यांच्या पुढाकाराने आयोजन करण्यात आले, प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर गीत सादर करण्यात आले, जीवन कार्यावर मान्यवरांनी विचार प्रकट केले प्रास्ताविक मिनाक्षी खरवडे यांनी केले .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शीतल पवार,सविता मेश्राम,निकिता नांदुरकर,,अल्का गजबे,शीतल बारसींगे, देवयानी मेश्राम,निशा भोयर,विद्या नेवारे, कविता कुमरे,चंदा डोमळे,शुकेशिनी रामटेके,प्रसाद खरवडे,गौतम गेडाम,भास्कर इंगळे जिल्हा सचिव, संजीव जिवतोडे जिल्हा कोषाध्यक्ष, डॉ.देवेंद्र मुनघाटे संघटनमंत्री, नामदेव पोले जिल्हा शहर सह संयोजक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन समीता गेडाम, आभार प्रदर्शन सोनल ननावरे यांनी मानले.
