जाहिरात
गडचिरोली

मौजा माडे तुकुम येथे २ तणसीचे ढग जळून खाक.

गावकऱ्यांच्या सतर्कतेने मोठी हानी टळली.

Spread the love

आज दुपारी ३ वा गडचिरोली पासून अवघ्या 3 किलोमीटर वर असलेल्या माडेतुकूम येथील संतोष सुरपाम व शिला पावले यांच्या गावा जवळील शेतातील तणसीच्या ढगास आग लागली.
सोबतच आजूबाजूच्या शेतातील ढगाला पण आग लागली दिवस उन्हाचे असल्याने आग मोठया प्रमाणात वाढू लागली पण गावकऱ्यांच्या सतर्कतेने आग विझवण्यास मोलाचे सहकार्य झाले. जवळपास २ ते ३ तणसीचे ढग जळून खाक झाली.
यात शेतकर्यांचे बरेच नुकसान झाले.गावकऱ्यांनी अग्नीशामन यंत्रणेला बोलावून आग आळोक्यात आणली .
झालेल्या नुकसानीची पाहणी करतांना तहसिलदार महेंद्र गणविर ,तलाठी,खरपुंडी च्या सरपंच सौ.मशाखेत्री, सचिव बोरकर ,ग्रा.प.सदस्य श्री बाळु मेश्राम, श्री, दिनेश आकरे व गावकरी श्री.ढोंगे ,सिडाम टिगुसले,मलेलवार,ढाकराव ,बाळु आकरे,केशव उसेंडी,व गावकरी उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button