जाहिरात
गडचिरोली पोलीसभामरागड

२ लाख रुपये इनामी व अनेक गुन्ह्यात सहभागी नक्षली पोलिसांच्या ताब्यात

Spread the love

लोकशाही न्युज गडचिरोली /भामरागड (दि,२७ डिसेंम्बर)

दिनांक २५/१२/ २०२२ रोजी उपविभाग भामरागड मधील पोमकें धोडराज हद्दीतील मौजा नेलगुंडा या गावात जहाल नक्षली नामे वत्ते ऊर्फ प्रदीप वंजा वड्डे, वय ४० वर्षे, रा. नेलगुंडा तह. भामरागड जि. गडचिरोली हा त्याच्या स्वत:च्या गावात लपून बसलेला आहे. या मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे गडचिरोली पोलीस दलाच्या विशेष अभियान पथकाचे जवान अभियान करीता असतांना त्याला ताब्यात घेतले.
गडचिरोली जिल्ह्रामध्ये नक्षलवादी नेहमीच शासकिय मालमत्तेचे नुकसान करीत असतात तसेच पोलीस दलाचे नुकसान अथवा घातपात करण्याच्या उद्देशाने योजना आखत असतात. मिळालेल्या माहितीवरुन हा जहाल नक्षलवादी काही विघातक कृत्य करण्याच्या उद्देशाने गावामध्ये लपून बसलेला होता. त्याच्या विघातक कृत्यांना वेळीच आळा घालण्यात गडचिरोली पोलीस दलाला यश मिळाले आहे. अटक करण्यात आलेला नक्षलवादी नामे – वत्ते ऊर्फ प्रदीप वंजा वड्डे, वय ४० वर्षे, रा. नेलगुंडा, तह. भामरागड, जि. गडचिरोली येथील असुन, १९९७ साली तो नक्षलमध्ये भरती होवुन, सध्या भामरागड दलममध्ये सदस्य या पदावर कार्यरत होता. त्याच्यावर ३ पोलीस खुनासहीत ८ खुन, ३ चकमक, १ दरोडा व इतर २ असे एकुण १३ गुन्हे दाखल आहेत. अशा अनेक गुन्ह्रामध्ये त्याचा सहभाग असून, सदर नक्षलवाद्यास गडचिरोली पोलीस दलाने अटक केलेली असून, पुढील तपास गडचिरोली पोलीस दल करीत आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button