जाहिरात
आपला जिल्हा

९ जानेवारी ला पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येच्या निषेधार्थ मूक मोर्चा

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि,८ जानेवारी)

छत्तीसगड येथील NDTV चे पत्रकार मुकेश चंद्रकार यांची निर्घुण हत्या करण्यात आली त्यांच्या हत्येचा निषेधार्थ उर्वरीत मारेकऱ्यांना पोलीसांनी पकडून कठोर शिक्षा द्यावी या मागणीसाठी गडचिरोली येथे पत्रकारांचा मुक मोर्चा गुरुवार दि. ०९ जानेवारी २०२४ ला दुपारी १२ वाजता मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

तरी सदर मोर्चात दैनिकांचे जिल्हा प्रतिनिधी, तालुका प्रतिनिधी, ग्रामीण प्रतिनिधी, साप्ताहिक विंग व लोकल दैनिकाचे जिल्हयातील संपादक, पोर्टल , व युटयुब प्रतिनिधी व्हाईस ऑफ इंडिया चे जिल्ह्यातील सर्व प्रतिनिधींनी मोर्च्यात सहभागी होवून एकतेचे दर्शन घडवावे.

मोर्चा इंदिरा गांधी चौकातून जिल्हा कचेरीवर नेऊन जिल्हाधिकारी गडचिरोली यांना मागण्यांचे निवेदन देण्यात येईल. तरी इंदिरा गांधी चौकातील विश्रामगृह येथे गुरुवार दि ०९ जानेवारीला दुपारी १२ वाजतापर्यंत एकत्रित जमावे व मुक मोर्च्यात सहभागी व्हावे असे आवाहन पत्रकार प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी निवेदनाद्वारे केलेले आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button