मिहीर फाऊंडेशन गडचिरोली तर्फे विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप
गडचिरोली/ कॉम्प्लेक्स (दि,२९ नोव्हेंबर)
मिहीर भास्कर मेश्राम याच्या वाढदिवसानिमित्त मिहीर फाऊंडेशन गडचिरोली तर्फे महात्मा गांधी नगर परिषद शाळा गडचिरोली कॉम्प्लेक्स येथे बॅग वाटपाचा कार्यक्रम संपन्न .
(स्कूल बॅग चे वाटप करताना मान्यवर )
महात्मा गांधी नगर परिषद शाळा गडचिरोली कॉम्प्लेक्स येथे सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग चे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य अँड.राम मेश्राम हे उपस्थित होते.मिहीर फाऊंडेशन चे अध्यक्ष भास्कर मेश्राम, उपाध्यक्ष अड ,विप्लव मेश्राम, सचिव डॉ.मृणाली मेश्राम, सहसचिव सीमा तेलंग, कोषाध्यक्ष मंगला रामटेके, सदस्य वर्षा गेडाम,रोशन मेश्राम , बाळकृष्ण बांबोळे, कचरुजी गेडाम, गुरूदास लोणारे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष विलास निंबोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना बॅगचे वितरण करण्यात आले. मिहीर फाउंडेशनचे अध्यक्ष भास्कर मेश्राम यांनी याप्रसंगी ही संस्था गरजू लोकांना शिक्षण व आरोग्य संदर्भात मदत करेल अशी माहिती दिली .यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदिप बुरांडे , मुख्याध्यापिका श्रीमती प्रतिभा साळवे मॅडम, काळे मॅडम, बन्सोड सर, राजगडे मॅडम तसेच देवयानी तेलंग, शांताबाई गेडाम,पूजा गेडाम, वर्षा बांबोळे, पायल डोर्लीकर , सुमीत तेलंग, डॉ.नितेश सोनटक्के, डॉ.डिंपल नैताम, मंजूश्री रायपूरे व विद्यार्थी उपस्थित होते.

