जाहिरात
आपला जिल्हागडचिरोली

श्रीराम नवमीला होणार भव्य साईबाबा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा स्थापना

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,२५ मार्च)

गडचिरोली शहरातील चामोर्शी महामार्गावर धन्वंतरी हॉस्पिटलच्या मागे जुन्या साई मंदिराच्या जागेवर नवनिर्मित मंदिरामध्ये अनंत कोटी ब्रम्हांडनायक महाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंद सद्गुरू श्री साईबाबा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा चैत्र शुद्ध नवमी रोज गुरुवार दिनांक ३० मार्च २०२३ ला सकाळी १० वाजता गणेशजीच्या आशीर्वादाने संपन्न होत आहे.

(या नवनिर्मित मंदिरामध्ये होणार भव्य साईबाबा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा)

तीन दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन

चैत्र शुद्ध सप्तमी रोज मंगळवार दि,२८ मार्च ला २०२३ ला सकाळी ९ वा :
श्री गणपती पूजन, सरस्वती पुण्यह वाहन, मातृका पूजन, मंडप पूजन, अखंड दीप स्थापना
सकाळी ११ वा :
आयुध मंत्र जप,अग्नीस्थापना
दुपारी १ वा :
नवग्रह मंडल, वास्तु मंडल स्थापना
दुपारी ३ वा :
सर्वत्रोभद्र मंडलस्थापना
सायंकाळी ५ वाजता: जलाधिवास
सायंकाळी ७ वा :
एक शाम साई के नाम भजन संध्या होणार आहे तरी शहरातील सर्व भाविक भक्तांनी या भजनसंधेचा लाभ घ्यावा.

चैत्र शुद्ध अष्टमी रोज बुधवार दि,२९ मार्च २०२३ ला
सकाळी १० वा : हवन
दुपारी २ वा: बलिदान
दुपारी ३ वा : सप्त आसरा पुजन (जनमातृका)
साय ४ वा :शोभायात्रा (पालखी)
सायं ६ वा : शय्याशयन,धान्यधिवास, पुष्पधिवास,फलाधिवास,
रात्री ८ वा :सुंदरकांड (राजस्थानी समाज बांधव)

चैत्र शुद्ध नवमी रोज गुरुवारला ३० मार्च २०२३ ला
सकाळी ८ वा :प्रायश्चित
सकाळी १० वा :भव्य साई बाबा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा स्थापना
सकाळी ११ वा : महापूजा
सकाळी १२ वा : मध्यान आरती
दुपारी १ वा :पूर्णाहुती हवन
सायं ६ वा :धूप आरती
सायं ७ वा : श्री साईस चरित्र (साईस्नेही नरेंद्र नाशिरकर ,नागपूर )
सायं ७ ते रात्री ११ वा : कार्यक्रमाला आलेल्या सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे.

तरी साई बाबांच्या सर्व भाविक भक्तांना साईबाबाच्या चरणी सेवा अर्पण करून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन विष्णू मणिराम कांबळे व साईभक्त परिवार यांनी केले आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button