जाहिरात
गडचिरोलीराजकीय

२६ नोव्हेंबर ला आम आदमी पार्टी संविधान दिन व स्थापना दिनानिमित्त रॅली

Spread the love

गडचिरोली (दि,२५ नोव्हेंबर )

आम आदमी पार्टी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने संविधान दिनानिमित्त तसेच आम आदमी पार्टीचा दहावा वर्धापन दिनानिमित्त जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकडे यांच्या नेतृत्वात दि, २६ नोव्हेंबर २०२२ शहरात रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात दिल्ली आणि पंजाब मध्ये बहुमताच्या जोरावर सुरू असलेले यशस्वी सरकार सर्व सामान्य जनतेला न्याय देत असून विज,पाणी,शिक्षण,आरोग्य, रोजगार या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असलेले सरकार महाराष्ट्रात आणण्यासाठी पार्टीचे प्रयत्न आहे. तसेच पार्टीचा १० वर्धापनदिन दिन व संविधान वाचन दिन‌‌‌ उत्साहात साजरा करण्यासाठी बहु संख्येने सकाळी १० वाजता पार्टी कार्यालयात हजर राहावे असे आम आदमी पार्टी तर्फे जनतेला आवाहन करण्यात आले आहे.

आप कार्यालय कॅम्प एरीया ते इंदिरा गांधी चौक ते रेड्डी गोडाऊन ते पार्टी कार्यालय असा रॅलीचा मार्ग राहणार असून पार्टी कार्यालयात समारोप करण्यात येणार आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button