वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेतील ग्रामविकासाची संकल्पना पूर्ण करा,आमदार डॉ देवराव होळी
गडचिरोली (दि,२१ नोव्हेंबर)
रामनगर गडचिरोली येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५४ व्यां पुण्यतिथी महोत्सवाचा आमदार डॉ देवराव होळी यांच्या अध्यक्षेखाली समारोप

वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा ५४ वा पुण्यतिथी कार्यक्रम मौजा रामनगर येथे मोठ्या थाटात संपन्न करण्यात आला ,यावेळी सत्कार मूर्ती मा. डॉक्टर शिवनाथजी कुंभारे, भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, माजी नगराध्यक्षा सौ. योगिता पिपरे, गुरुदेव सेवा मंडळाचे पंडित पूडके सर, ग्रामसेवाधिकारी सुरेश मांडवगडे उपग्रामसेवाधिकारी , मधुकर भोयर, समन्वयक प्रमूख श्री रमेश भूरसे, सचिव श्री कवडु येरमे, सहसचिव रामकृष्ण ताजने , कोषाध्यक्ष चंद्रभान गेडाम प्रचारक नानाजी वाढई, माजी नगरसेवक श्री सतीश विधाते , चामोर्शी भाजपा तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, श्री हेमंत बोरकुटे, सौ. कविता उरकुडे, माजी नगरसेविका सौ अनिता विश्रोजवार, माजी नगरसेविका सौ. वर्षा शेडमाके, यांचेसह गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते व गुरुदेव भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आपल्या अध्यक्षीय स्थानावरून बोलताना आमदार डॉक्टर देवराव होळी म्हणाले की ,माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांनी विकासाचे ग्राम असे स्वप्न बघितले असून त्यांनी सतत आपल्या भाषणांमध्ये वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कार्याचा गौरव केला आहे. ग्रामगीतेच्या संकल्पनेतील गाव विकासाचा आराखडा तयार करून गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित गुरुदेव भक्तांना केले तसेच वंदनीय राष्ट्रसंत यांचे कार्य गावोगावी घरोघरी पोहोचविण्याची आवश्यकता असून त्यांच्या विचारांची ही आज गरज असल्याचे याप्रसंगी ते म्हणाले.
