जाहिरात
गडचिरोलीब्रेकिंग न्युज

नरभक्षक वाघाच्या हल्ल्यात ५५ वर्षीय इसमाचा बळी

Spread the love

गडचिरोली (दि,३ नोव्हेंबर)
गडचिरोली मुख्यालयापासून ८ किलोमीटर दूर राजगाठा या गावी जंगलाला लागून असलेल्या आपल्या शेतात धान कापणी झालेल्या धानाची बांधणी कामाकरिता गेलेल्या इसमावर दबा धरून बसलेल्या नरभक्षक वाघाने हल्ला करून सुधाकर भोयर रा. राजगाठा ( वय ५५) या इसमाचा बळी घेतला. सदरची घटना दुपारी १ वाजताच्या दरम्यानची आहे.
त्याच्या मृत्यू पश्चात पत्नी व एक मुलगा, सून आहे.भोयर परिवारावर शोककळा पसरली आहे .

(वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या इसमाचा मृतदेह पंचनामा करून शवविच्छेदनासाठी नेण्याकरिता विरोध दर्शवला आहे त्यामुळे काही काळ त्या गावांमध्ये संतप्त जमावाने वातावरण चिघळलेले होते.

काही दिवसापूर्वी वन विभागाच्या टीमने सिटी १ या नामक वाघाला पकडून जेरबंद केले तेव्हापासून जनतेने वाघाच्या हल्ल्यापासून सुटकेचा श्वास सोडला होता,पण आणखी दुसऱ्या नरभक्षक वाघाने जागोजागी हल्ले करून लोकांचे जीव घेत असल्याने भीतीचे वातावरण तयार झाले आहे .

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button