डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती तसेच वाचन प्रेरणा दिवस व भारतीय वृत्तपत्र विक्रेता दिवस साजरा
गडचिरोली (दि,१५ ऑक्टोंबर)
गडचिरोली शहर वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने आज 15 ऑक्टोंबर ला भारताचे माझी राष्ट्रपती भारतरत्न मा. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम साहेब यांची जयंती तसेच वाचन प्रेरणा दिवस व भारतीय वृत्तपत्र विक्रेता दिवस साजरा करण्यात आला.
आजच्या कार्यक्रमाला देशोन्नती वृत्तपत्राचे जिल्हा प्रतिनिधी श्री. अनिल धामोळे साहेब, पुण्यनगरी वृत्तपत्राचे जिल्हा वितरण प्रतिनिधी श्री. केशव हुकरे साहेब, नवराष्ट्र, नवभारत वृत्तपत्राचे जिल्हा वितरण प्रतिनिधी श्री. अहमद वकार साहेब, गडचिरोलीचे जेष्ठ वितरक श्री. श्रिकांतजी पतरंगे, डॉ. मधुकर चुधरी साहेब, येगावकर साहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
याप्रसंगी देशोन्नती चे जिल्हा प्रतिनिधी श्री. धामोळे साहेब यांनी मा. कलाम साहेबांबद्दल आपले विचार मांडले. तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांबद्दल विचार प्रगट केले. श्री. धामोळे जी म्हणाले की, वृत्तपत्र तर आज सर्वच बाबतीत डिजिटल झाले आहे परंतु घरोघरी वृत्तपत्र वाटपाचे काम आजही वृत्तपत्र विक्रेताच करतो आहे. वृत्तपत्राचा खरा घटक हा वृत्तपत्र विक्रेताच आहे असे ते म्हणाले. यावेळी संघटनेचे माझी अध्यक्ष श्री. राजेन्द्र गव्हारे यांनी सुद्धा कलाम साहेब, वृत्तपत्र विक्रेता दिवस व वाचन दिन या बद्दलचे विचार मांडले.
कार्यक्रमाची सुरवात संघटनेचे अध्यक्ष श्री. अनिल बाळेकरमकर यांच्या हस्ते भारतरत्न मा. डॉ. कलाम साहेब यांच्या प्रतिमेला मालार्पण व दिप प्रज्वलन करून करण्यात आली. कलाम साहेब यांची जयंती व भारतीय वृत्तपत्र विक्रेता दिवस या निमित्त पेपर वाटप करणार्या सर्व मुलांसाठी नाश्ता व चहाचे आयोजन संघटनेच्या वतीने यावेळी करण्यात आले होते. कार्यक्रमाचे संचालन संघटनेचे सचीव श्री. लोमेश बांबोळे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. राजेन्द्र गव्हारे यांनी केले.
आजच्या कार्यक्रमाला संघटनेचे कोषाध्यक्ष श्री. प्रशांत वाढई, सह कोषाध्यक्ष जयंत अर्जुनकर, सह सचिव मारोती बाळेकरमकर, तसेच संजय आकरे, संदीप आकरे, उमेश सोनटक्के आदी सदस्य आणि आकाश वैरागडे, निलेश वाढई सह इतर पेपर वाटप करणारी मुले उपस्थित होते.
