जाहिरात
चिमुरनेरी

नेरी येथील 24 वर्षीय युवकांने गळफास घेऊन संपविली जीवनयात्रा

Spread the love

प्रतिनिधी- प्रवीण वाघे,(दि,१५ ऑक्टोंबर)

नेरी येथील एका युवकाने दि,12 ऑक्टोबर ला रात्रौ 8. 30 वाजता च्या दरम्यान स्वच्या राहत्या घरी हार्डवेअर च्या दुकानात शटर बंद करून दोराच्या साहाय्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली
नेरी येथील नेरी नवरगाव मार्गावर राहत असलेल्या अक्षय केवळराम कामडी वय 24 वर्षे यांने रात्री 8.30 वाजता दरम्यान आपल्या हार्डवेअर च्या दुकानात आत मध्ये प्रवेश करून शटर बंद करून दुकानाच्या लोखंडी राडला दोर बांधून गळफास घेतला आणि आपली जीवन यात्रा संपविली सदर दुकान आणि घर एकच असल्याने अक्षय आत मध्ये काय करत आहे बराच वेळ झाला तरी बाहेर आला नाही त्यामुळे आईला शंका आली असता त्यांनी एकाला दुकानात पाहायला सांगितले असता एका इसमाने दुकानाचे शटर उघडून पाहिले असता अक्षय हा लटकत असल्याचे दिसून आले त्यामुळे एकच बोब उडाली हे गंभीर दृश्य पाहून घरच्यांना धक्काच बसला आणि सर्व कुटूंबीय शोकसागरात बुडाला सदर घटनेची माहिती गावात पसरताच घटनास्थळी बघव्याची गर्दी झाली.

सदर घटनेची माहिती चिमूर पोलीस स्टेशनला देताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले उपनिरीक्षक शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रेताचे पंचनामा करून उत्तरणीय तपासणी साठी उपजिल्हारुग्णालय चिमूर येथे पाठविण्यात आले वृत्त लिहिपर्यंत मृत्यु चे कारण कळू शकते नाही अक्षय हा कमावता मुलगा असल्याने कुटूंबाचा भार आता वडील आई लहान भाऊ बहीण यांच्यावर आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेख करीत आहेत.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button