चंद्रपूर /मूल (दि,१३ ऑक्टोंबर)
चंद्रपूर – मूल मार्गावर झालेल्या अपघातात एका ६० वर्षीय सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवारी घडली. उपनिरीक्षकाची पत्नी व वाहनचालक गंभीर जखमी झाले आहेत.
चंद्रपूर मुल मार्गावर जानाळा आगडी या गावा नजीक सिफ्ट गाडीला विरुद्ध दिशेने येणाऱ्या आयसर गाडी ने समोरा समोर धडक दिल्याने सिफ्ट गाडी (वाहन क्रमांक MH 31 DK 2350 ) मधील माणिक कुमरे वय वर्ष (६०) वर्षीय सेवानिवृत पोलीस उप निरिक्षक यांचा घटनास्थळी मृत्यू झाला तर त्यांचा पत्नी आरती माणिक कुमरे व चालक हेमंत मेश्राम हा गंभीर जखमी आहे पुढील तपास मुल पोलिस करीत आहेत. स्विफ्ट डिझायर कार हे संपूर्ण अपघातात चेंदामेंदा झाली आहे.
जाहिरात
