नक्षल्यांनी पुरुन ठेवलेले स्फोटक साहीत्य पोलिसांकडून जप्त
गडचिरोली/कुरखेडा (दि,१२ ऑक्टोंबर)
दि, ११/१०/२०२२ रोजी दुपारी १२.०० वा. उपविभाग कुरखेडा अंतर्गत येत असलेल्या पोमकें मालेवाडा हद्दीमध्ये मौजा लडुडेरा (हेटळकसा) जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी पोलीस पथकांना नुकसान पोहचवून मोठा घातपात घडवून आणण्याचे उद्देशाने, मोठ्या प्रमाणात दारुगोळा, स्फोटके व इतर साहित्य पुरून ठेवले असल्याच्या गोपनिय माहितीच्या आधारे विशेष अभियान पथक गडचिरोली व बी.डी.डी.एस. पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना एका संशयीत ठिकाणी लपवुन ठेवलेले स्फोटके व इतर साहित्य शोधुन काढण्यात जवानांना यश आले आहे.
(नक्षली साहित्य निकामी करताना)
मिळुन आलेल्या डंपमध्ये २ नग जियंत कुकर, २ नग क्लेमोर, १ नग पिस्टल, २ नग वायर बंडल व पाणी साठवण्याचा १ नग जर्मन गंज इत्यादी नक्षल साहित्य हस्तगत करून, घटनास्थळावर मिळालेल्या मुद्देमालावर कायदेशिर कारवाई करण्यात आली. यात स्फोटकांनी भरलेले ०२ नग कुकर व २ नग क्लेमोर हे बीडीडिएस पथकाच्या मदतीने अत्यंत सतर्कतेने जागेवरच नष्ट करण्यात आले असून, इतर साहीत्य गडचिरोली येथे आणण्यात आलेले आहे. गडचिरोली पोलीस दलाकडुन पुढील कारवाई सुरु आहे.
