दसऱ्याच्या शुभ पर्वावर झेंडूच्या पिवळ्या,केशरी फुलांनी सजली बाजारपेठ

गडचिरोली (दि,४ ऑक्टोंबर)
दसरा अर्थात विजयादशमी म्हणजेच विजयाचा उत्सव केवळ महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतात हा सण साजरा होतो या सणाला झेंडूच्या फुलाचे अनन्य साधारण महत्त्व आहे झेंडूचे फुले घरोघरी सजावटीसाठी, पूजेसाठी,आणली जातात देवपूजा , तोरण,शस्त्रपूजा तसेच वापरातील यंत्र वाहन व प्रवेशद्वारावर सजावटीसाठी झेंडूच्या फुलाचा वापर होतो.

दसरा या सणाच्या शुभपर्वावर गडचिरोली शहरात मुख्य इंदिरा गांधी चौकात पिवळ्या व केशरी झेंडूच्या फुलांनी बाजारपेठ सजल्याचे एकच चित्र दिसत आहे झेंडूची फुले घेऊन विक्रेते मोठ्या प्रमाणात विक्री करण्याकरिता शहरांमध्ये बसले आहेत फुलांची दरे साधारणता १०० रुपये प्रति किलो, १२० रुपये प्रति किलो व उच्च दर्जाची फुले १५० रुपये प्रती किलो विक्री करताना दिसत आहेत दसऱ्याच्या सणाला बाजारपेठेत झेंडूच्या फुलाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
