निधन वार्ता
गडचिरोली : राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या प्रदेश उपाध्यक्ष गीता हिंगे यांचे अपघाती निधन

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. ८ डिसेंबर)
आधार विश्व फाऊंडेशनच्या अध्यक्ष, कुशल राजकीय संघटक तथा राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या प्रदेश उपाध्यक्ष गीता सुशील हिंगे यांचे काल मध्यरात्री अपघाती निधन झाले.
नागपूर वरून परत गडचिरोली येताना उमरेड नागपूर महामार्गावरील पाचगाव जवळ हा अपघात झाला. विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोठया वाहणाने त्यांच्या कारला डीवाईडर तोडून धडक दिली. सुशील हिंगे व चालक यांना किरकोळ मार लागल्याने ते अपघातातून बचावले आहेत.
मृतक गीता हिंगे यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ४ वाजता कठाणी नदी घाटावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांना पती, दोन मुले व बराच मोठा आप्त परिवार आहे.
त्यांच्या अपघाती निधनाने गडचिरोलीत शोककळा पसरली आहे.
जाहिरात
