जाहिरात
गडचिरोलीराजकीय

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री मा.ना.देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोली जिल्हा नियोजन समितीची सभा संपन्न..

सामान्य जनकल्याणासाठी कटिबद्ध व जिल्हाच्या विकासासाठी अनेक समस्या मार्गी लागणार मा.खा.अशोक नेते

Spread the love

गडचिरोली (दिं.०१ ऑक्टोंबर)

मेडिकल कॉलेज, विद्यापीठ उपकेंद्रासाठी जागेचे अधिग्रहण लवकरच!
– कोन्सरी प्रकल्पाला गती देणार, १८,००० कोटींची गुंतवणूक!
– मेडिगट्टासंदर्भात सर्वंकष पॅकेज तयार करणार!
गडचिरोली जिल्हा नियोजन समिती बैठकीत विविध विषयांचा आढावा!

फडणवीस म्हणाले की, मेडिगट्टा संदर्भात ज्या शेतकर्‍यांच्या जमिनी पाण्याखाली जातात, त्यांचे अधिग्रहण करून जमीनीचे मूल्यांकन, झाडे असतील त्यासाठी वेगळे पॅकेज आणि आवश्यकता असेल तर सानुग्रह अनुदान असे सर्वंकष पॅकेज तयार करण्यास सांगण्यात आले आहे.
वाहतुकीमुळे नागरिकांना येणार्‍या अडचणी दूर करण्यासाठी ‘मायनिंग कॉरिडॉर’ तयार करून त्यावरूनच वाहतूक होईल, असा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्याचा आराखडा लवकरच तयार करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

गडचिरोली जिल्ह्याची सत्र-२०२२-२३ ची जिल्हा वार्षिक नियोजन बैठक दिनांक ०१ऑक्टोंबर २०२२ रोज शनिवार ला जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री, राज्याचे मा. उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन सभागृहात पार पडली.

त्या अनुषंगाने जिल्हा वार्षिक योजनेकरिता खासदार अशोकजी नेते यांनी शेतकरी, शेतमजूर, व सामान्य नागरिकांच्या विविध समस्या बाबत संबंधी प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंत्री महोदय उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस यांना सविस्तर सांगितले.

गडचिरोली जिल्ह्यात सिंचनाचे प्रश्न रस्त्याचे प्रलंबित प्रश्न,आरोग्याचे प्रलंबित प्रश्न, लवकरात लवकर मार्गी लागणार गडचिरोली जिल्हा हा आदिवासी अतिदुर्ग जिल्हा असल्याने आरोग्याच्या दृष्टिकोनातून अनेक सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने एमआरआय (MRI)मशीन सुद्धा या गडचिरोली जिल्ह्यात उपलब्ध करून दिल्या जाईल. तसेच कोणसरी प्रोजेक्ट संबंधी खनिजाचा जिल्ह्यातच प्रोसेसिंग करून या प्रोजेक्टद्वारे स्थानिक लोकांना लोकांना रोजगार मिळावा याकडे सुद्धा विशेष लक्ष आहे.

जिल्ह्याच्या विकासासाठी खासदार अशोकजी नेते यांनी गोंडवाना युनिव्हर्सिटी,तसेच मेडिकल कॉलेज संबंधित जमीन अधिग्रहण करून लवकरात लवकर सुरू करण्यात यावे.
आलापल्ली सिमेंट काँक्रीट रस्ता लवकरात लवकर चालू करण्यात यावे. रेल्वे संबंधी सुद्धा लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावावे.

जिल्ह्यात पाच बंधारे पैकी चिचडोह या एकच बंधारेचे काम पूर्ण झालेले असून कोटगल बॅरेजचे काम चालू आहे. तसेच चामोशी तालुक्यात कळमगांव,अहेरी तालुक्यात देवलवाही,आरमोरी तालुक्यातील मुलुर या ठिकाणच्या बंधारेच सुद्धा काम लवकरात लवकर चालू करावे.


(राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा पालकमंत्री गडचिरोली जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समितीच्या आढावा बैठकीला हजर अधिकारीवर्ग )

इत्यादी प्रश्न खा.अशोक नेते यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी मार्गी लावण्यासंबंधी प्रश्न उपस्थित केले.
याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस, खासदार मा.अशोक नेते, जिल्हाध्यक्ष कीसन नागदेवते, जिल्हाधिकारी संजय मिना, आम.डॉ.देवरावजी होळी, आम.कृष्णा गजबे,आम.धर्मराव बाबा आत्राम,आ.अभिजित वंजारी,ओबिसी विदर्भ संपर्क प्रमुख तथा जेष्ठ नेते बाबुराव कोहळे,संघटन जिल्हा महामंत्री रविंद्र ओलालवार,जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे,प्रदेश सदस्य सदानंद कुथे, महिला आघाडी प्रदेश सदस्या रेखा डोळस,आशिष पिपरे नगरसेवक चामोशी.तसेच अनेक पदाधिकारी विशेष पोलिस महानिरीक्षक, पोलिस अधीक्षक, मुख्य वनसंरक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, इतर अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button