जाहिरात
चिमुरब्रेकिंग न्युज

ब्रेकिंग-काजळसर येथील ट्रॅक्टर अपघातातील दुसऱ्याही महिलेचा उपचारा दरम्यान नागपूर येथे निधन

Spread the love

प्रतिनिधी-प्रवीन वाघे, (दि,२८ सप्टेंबर)

चिमूर तालुक्यातील नेरीवरुन जवळ असलेल्या काजळसर ला २४ सप्टेंबर ला गणपती विसर्जन करून परत येत असताना तट्रॅक्टर ची ट्राली पलटून भीषण अपघात झाला यात एक महिला जागेवरच ठार झाली होती. तर सहा जण गंभीर जखमी झाले होते आणि ३५ जन शालेय विद्यार्थी सहित किरकोळ जखमी झाले होते या अपघातात गंभीर जखमी पैकी सौ निर्मला संपत मेश्राम वय ४५ वर्षे यांचा नागपूर येथील मेडिकल रुग्णालयात आज दुपारी २ वाजता उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला ,
सदर महिला ही या अपघातात गंभीर जखमी झाली होती तिला डोक्याला गंभीर मार लागला होता चिमूर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते परंतु प्रकृती गंभीर असल्याने तिला उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले होते मेडिकल रुग्णालयात तिच्यावर अतिदक्षता विभागात ट्रामा सेंटर ला उपचार सुरू होते पाच दिवस मृत्यूशी झुंज देत आज दुपारी २ वाजता त्यांची प्राणज्योत मावळली त्यामुळे काजळसर गावात हळहळ व्यक्त होत असून मेश्राम परिवारावर शोककळा पसरली आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button