जाहिरात
चिमुरनेरी

मुख्याध्यापिका सौ. पुष्पलता कामडी यांचा सत्कार तथा निरोप समारंभ

Spread the love

प्रतिनिधी-प्रवीन वाघे, (२४ सप्टेंबर)

लोक कल्याण शिक्षण मंडळ नेरी द्वारा संचालित जनता प्राथमिक विद्यालय नेरी येथील मुख्याध्यापिका सौ. पुष्पलता चंद्रकांतजी कामडी या नियत वयोमानाने दिनांक 31/08/2022 रोजी सेवानिवृत्त झाल्यात. त्यांनी 38 वर्षे शाळेची सेवा केली तसेच 13 वर्षे 4 महिने मुख्याध्यापक म्हणून पदभार पाहिला. त्यांच्या उत्कृष्ठ कार्याची पावती म्हणून आज स्व. विक्रांत विष्णुकांत बीरेवार स्मृती सभागृह जनता विद्यालय नेरी येथे त्यांच्या निरोपाचा तसेच सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला.

(मुख्याध्यापिका कामडी मॅडम यांना निरोप प्रसंगी मान्यवर)

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष- संस्थेचे उपाध्यक्ष श्री. टिकारामजी पिसे,प्रमुख अतिथी- सदस्य श्री. मनोहरराव पिसे, सदस्य श्री. सुरेशराव पिसे, जनता प्रा. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. भांडे सर, जेष्ठ शिक्षिका सौ. टी. डी.शिवरकर, जनता विद्यालयाच्या पर्यवेक्षिका कु. बि. के. बमनोटे होते. त्याचप्रमाणे जनता विद्याभारती कॉन्व्हेंट, जनता प्रा. विद्यालय, जनता विद्यालय तथा क. महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका तथा शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते . संस्था व संचालित सर्व शाळांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.
उपस्थित मान्यवर यांनी मुख्याध्यापिका सौ. कामडी मॅडम यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. लहान लहान बालकांना घडवत उत्तम कार्य करतांना सोबतच मुख्याध्यापिका पदाचा कार्यभार सांभाळणे हे अतिशय कठीण कार्य काटेकोरपणे त्यांनी करून दाखवले.
कार्यक्रमाचे संचलन श्री. ए. एच. बोरकर, व प्रस्तावना कु. यु. एम. पंधरे यांनी केले होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button