जाहिरात
गडचिरोली

२६ ऑगष्ट ला तेली समाजाचा मेळावा

मेळाव्याच्या नियोजनासाठी बैठक पार

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,२५ ऑगष्ट)

तेली समाज बांधव व आमदार डॉ. देवराव होळी मित्र परिवार यांच्या वतीने भव्य तेली समाज मेळावा,जेष्ट नागरिक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन दि.२६ ऑगष्ट रोजी दुपारी २.०० वाजता सेलिब्रेशन फंक्शन हॉल चामोर्शी रोड गडचिरोली येथे करण्यात आले आहे.

त्यानिमित्त आज दि.२४ ऑगस्ट रोजी इंदिरा गांधी चौक येथिल शासकीय विश्रामगृह येथे तेली समाजाचे प्रमुख पदाधिकारी यांची नियोजनात्मक बैठक महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासंघ गडचिरोली जिल्हाध्यक्ष इंजि.प्रमोद पिपरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

बैठकीला जिल्हा संघटक रमेश भुरसे,जिल्हा सचिव मुक्तेश्वर काटवे,तेली समाज आघाडी महिला जिल्हाध्यक्ष लता कोलते,जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे,जिल्हा उपाध्यक्ष गोपीनाथ चांदेवार,मधुकर भांडेकर,गजानन बुरांडे,चेतन कोलते,एम.डी.चलाख,वसंत सातपुते,दिलीप चांदेवार,पद्माकर पिपरे,विलास नैताम,रमेश बोधलकर,लालाजी सातपुते व तेली समाजातील अनेक मान्यवर, पदाधिकारी उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button