श्री माधव केंद्रे यांना लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्ड सिटी तर्फे दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

गंगाखेड प्रतिनिधी (१९ सप्टेंबर)
गंगाखेड तालुक्यातील श्री रोकडोबा माध्यमिक विद्यालय खंडाळी रोकडोबा येथे शिक्षक पदावर कार्यरत असलेले श्री माधव शिवहार केंद्रे यांना लायन्स क्लब गंगाखेड गोल्ड सिटी यांच्याकडून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना दिला जाणारा मानाचा आदर्श शिक्षक पुरस्कार काल गंगाखेड येथील राजेश्वर मंगल कार्यालय या ठिकाणी जिंतूर विधानसभेचे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर ,गंगाखेडचे माजी नगराध्यक्ष रामप्रभुजी मुंडे, संतोषजी मुरकुटे, विठ्ठल रबदाडे व लायन्स क्लबचे अध्यक्ष गोविंद रोडे या मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
माधव केंद्रे यांनी आतापर्यंत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला आहे तसेच सामाजिक कार्यात ते दरवर्षी आपला एक महिन्याचा पगार गोरगरीब उपेक्षित वंचित विद्यार्थ्यांसाठी दान करतात त्यांना आतापर्यंत विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे त्यात महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा मानाचा राज्य आदर्श पुरस्कार 2018 साली महाराष्ट्र शासनाकडून मिळाला तसेच मानव विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेकडून दिला जाणारा मानव विकास राज्य पुरस्कार मिळाला आहे तसेच मनुष्यबळ विकास अकादमी मुंबई कडून दिला जाणारा गुणि जन गुरुगौरव शिक्षक रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे तसेच पंजाबराव देशमुख यांच्याकडून दिला जाणारा महात्मा ज्योतिबा फुले पुरस्कार मिळाला आहे तसेच आदर्श शिक्षक समिती कडून दिला जाणारा विभागीय पुरस्कार सुद्धा प्रदान करण्यात आलेला आहे व त्यांना काल मिळालेल्या पुरस्कारामुळे संस्थेचे सचिव उत्तमराव जाधव शाळेचे मुख्याध्यापक श्री पिंपळे सर, सहशिक्षक शेख सर ,पवार सर, सूर्यवंशी सर, माधव जाधव, विष्णूदास भोसले, रोहिदास मोरताटे, राजाभाऊ जुबरे, नरसिंग स्वामी, या कर्मचाऱ्याकडून व गावकरी मंडळी यांच्याकडून सत्कार करण्यात आला त्यांच्या कार्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे8