जाहिरात
चिमुर

चिमूर तालुक्यातील काग ते नंदारा पांदण रस्त्याची दुरुस्ती करा

प्रहार सेवक अशिद मेश्राम चिमूर यांच्या कडुन आमदार बच्चू कडू यांना निवेदन सादर.

Spread the love

प्रतिनिधी-प्रवीन वाघे (दि,१९ सप्टेंबर)

चिमूर तालुक्यातील काग या गावातील काग ते नंदारा पाणंद रस्त्याची शेतशिवारात जाण्यासाठी पाणंद रस्ते असून या रस्त्यांची दप्तरी नोंद आहे.मात्र देखभालीअभावी बऱ्याच पांदण रस्त्यांची दुरावस्था झाली असल्याने शेतकरी प्रचंड त्रस्त आहेत.शेतातील उत्पादित माल व शेताकडे जाण्यासाठी शेतकऱ्यांना सोयीचे होईल याकरिता पांदण रस्त्यांचा उपयोग होतो.हे रस्ते पायवाट म्हणून अजूनही वापरले जात आहेत.काग परिसरात पांदण रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून पाण्याच्या डबक्यातून शेतकऱ्यांना वाट काढावी लागत आहे.पावसाळ्यात पांदण रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली असून पांदण रस्त्याच्या दुरुस्तीकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
काग ते नंदारा शेतकऱ्यांच्या पांदण रस्त्याचा गेल्या एक ते दोन वर्षांपासून शेतकऱ्यांच्या व प्रहार संघटनेच्या वतीने अशिद मेश्राम प्रहारसेवक चिमूर महेश भाऊ हजारे प्रहारसेवक, चंद्रपूर यांनी सतत माजी पालकमंत्री, जिल्हाधिकारी, यांना निवेदन देऊन पाठपुरावा करीत आहोत.परंतु अजूनही शेतकऱ्यांचा पाणंद रस्ता होऊ शकला नाही.हा रस्ता पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आला होता. परंतु त्यावेळी चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री यांनी स्वतः च्या मतदार संघातले पांदण रस्ते मंजूर करून घेतले. जिल्हाधिकारी साहेब, यांच्या कडे खनिजकर्म निधीतून रस्ता मंजूर करून द्यावा ही मागणी केली असता. सध्याच्या परिस्थितीत खनिजकर्म निधीचे काम ठप्प आहे.असे मा. जिल्हाधिकारी साहेब यांनी सांगितले असता. प्रहार सेवक अशिद मेश्राम यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चूभाऊ कडू माजी राज्यमंत्री महाराष्ट्र यांची अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार येथे भेट घेऊन चिमूर तालुक्यातील काग ते नंदारा शेतकऱ्यांच्या पांदण रस्त्याबाबत. निवेदन देऊन चर्चा केली. असता लवकरच शेतकऱ्यांचा काग ते नंदारा पाणंद रस्ता करू असे आश्वासन मा.आ. बच्चूभाऊ कडू माजी राज्यमंत्री, यांनी दिले.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button