जाहिरात
राजकीय

“भाजपा” सरकारचा अन्याय सहन करणार नाही, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,६ सप्टेंबर)
संपादक:संदिप कांबळे

केंद्रातील भारतीय जनता पार्टीचे सरकार व राज्यातील शिंदे, फडणवीस यांचे सरकार यांचा अन्याय जनता सहन करणार नाही असे मत आज झालेल्या कॉम्प्लेक्स परिसरातील सर्किट हाऊस येथे पत्रकार परिषदेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे.विदर्भाची काशी मार्कंडा येथून ३ सप्टेंबर ला जनसंवाद यात्रेला सुरू झाली त्या निमित्त आज ते गडचिरोली शहरात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

महाराष्ट्र राज्यात जवळपास सात हजार पाचशे महिला व मुली गायब झाल्या आहेत, या महिला अत्याचाराच्या घटनात वाढ होत असून वरील घटना वर राज्याचे गृहमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काहीच का बोलत नाही व आपले मत सुद्धा मांडत नाहीत असा यावेळेस प्रश्न सुद्धा उभा केला. महाराष्ट्रातील ३६ राज्यापैकी १९ राज्यांमध्ये पालकमंत्री दिले गेले व उर्वरित १७ जिल्ह्यामध्ये कुठलाही पालक मंत्री नाही त्याच्यामुळे शासकीय कामकाजाला वेग नाही, पाऊस न पडल्यामुळे राज्यात दुष्काळ सदृश्य स्थिती तयार झाली आहे व राज्यातील सरकार आपल्या निवडणुकांच्या तयारीमध्ये लागलेले आहेत.

येत्या निवडणुकीत गडचिरोली लोकसभा व विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचे खासदार व आमदार निवडून येतील असा विश्वास सुद्धा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.

पत्रकार परिषदेला नाना गावंडे समन्वयक, मारोतराव कोवासे माजी खासदार, महेंद्र ब्राह्मणवाडे जिल्हाध्यक्ष, नामदेव उसेंडी माजी आमदार, आनंदराव गेडाम माजी आमदार, पेंटाराम तलांडी, जेसा मोठवाणी, पंकज गुड्डेवार, नितीन कोडवते, डॉ नामदेव किरसान, सतीश विधाते शहराध्यक्ष, तुळशीराम पोरेटी, विश्वजीत कोवासे,रजनीकांत मोठघरे, रुपेश ठिकले, जावेद खान आदी पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button