जाहिरात
ताज्या घडामोडी

नुकसानग्रस्त भागातील पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत द्या

खासदार डॉ. किरसान यांचे जिल्हाधिकारी यांना पत्र

Spread the love

लोकशाही न्युज गडचिरोली (दि,२२ जुलै)

सतत च्या सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे व गोसीखुर्द धरणातून सूरु असलेल्या पाण्याच्या विसर्गाने गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्रातील संपूर्ण गडचिरोली जिल्हा, आमगाव, ब्रह्मपुरी आणि चिमूर विधानसभा क्षेत्रातील बहुतांश भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. बऱ्याच ठिकाणी रस्ते वाहून गेले, गावात आणि शहरात पाणी शिरल्याने घरांची आणि अन्यधान्याची मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन संपुर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे.

(गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया यांना लिहिलेले पत्र)

अश्या सर्व नुकसान ग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करून गरजूंना आर्थिक व आवश्यक ती मदत करण्यात यावी अश्या सूचना गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया यांना लिहिलेल्या पत्रातुन केले आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button