जाहिरात
क्राईम

आरोग्य सेविकेचा विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

तालुका वैद्यकीय अधिकाऱ्या विरोधात गुन्हा नोंद

Spread the love

लोकशाही न्युज, मुलचेरा (दि. ९ डिसेंबर)

मुलचेरा येथील कंत्राटी आरोग्य सेविका (C-ANM) यांनी दि. ६ डिसेंबर २०२५ रोजी त्यांचे राहते घरी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे, त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे आंतर रुग्ण म्हणुन भरती करण्यात आले होते. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद म्हशाखेत्री, वय- ५० यांनी कंत्राटी महिला आरोग्य सेविका यांना वेतनामध्ये वाढ करून देतो या आमिषाने मागील दोन वर्षापासून वारंवार शारीरिक सुखाची मागणी केली होती व मानसिक त्रास दिला होता.

यामुळे कंत्राटी महिला आरोग्य सेविका यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला, यावरून पो. स्टे. गडचिरोली येथे आज दि. ८ डिसेंबर २०२५ रोजी Zero FIR दाखल करण्यात आली असून भारतीय न्याय संहिता कलम ७५(२),७८ (२) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर कंत्राटी महिला आरोग्य सेविका यांची प्रकृती सध्या स्थिर असून पोस्टे मुलचेरा पोलीस या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button