लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,४ एप्रिल)
गडचिरोली शहरातील धानोरा रोडवरील जुन्या स्वराज हेल्थ क्लब च्या बाजूला असलेल्या नगर परिषदेच्या जागेवर भव्य असा वातानुकूलित सिनेमागृह साकारत आहे.
भव्य अशा वातानुकूलित सिनेमागृहामध्ये दर्शकांची संख्या जवळपास १२० दर्शकांची असणार असून त्यामध्ये १००, १५० व २०० असे तिकीट दर असणार आहेत.
नगरपरिषद प्रशासनाचे उत्पन्न वाढण्याकरिता हवा भरलेल्या थिएटर मध्ये हा वातानुकूलित भव्य ‘सिनेमागृह साकार होत आहे. हा सिनेमागृह प्रसंगानुसार इकडून तिकडे हलविण्यात पण येतो. सिनेमागृहाच्या बाजूला भव्य चारचाकी व दुचाकी वाहनासाठी पार्किंगची सुद्धा सोय करण्यात आलेली आहे.
गडचिरोली शहरात पूर्वीपासूनच दोन सिनेमागृह आहेत पण दर्शकाच्या नाराजीमुळे त्या सिनेमागृहाकडे दर्शकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळेच नगरपरिषद प्रशासन सुरू करत असलेल्या सिनेमागृहात लोक किती पसंती देतात हे पाहण्यासारखे आहे.
जाहिरात
