जाहिरात
गडचिरोलीताज्या घडामोडी

आमदार डॉ देवराव होळी हकालपट्टी करणारे कोण ? रमेश अधिकारी यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली माहिती

Spread the love

गडचिरोली (दि,५ सप्टेंबर)
आमदार डॉक्टर होळी यांच्याकडे मागील १२ ते १५ वर्षापासून रमेश अधिकारी हे काम करीत होते पण त्यांची तब्येत बरी नसल्याने मागील एक महिन्यापासून त्यांनी आमदार होळी यांच्याकडून काम सोडले व आपल्या स्वतःच्या बूट हाऊस मध्ये काम करायचे आमदार होळी यांनी वेगवेगळ्या माध्यमातून मला परत कामावर बोलवण्याची विनंती केली परंतु माझे काम करण्याची इच्छा नसल्याने मी कामावर येण्यास शुद्ध नकार दिला व खासदार अशोक जी नेते यांच्याकडे संघटनात्मक सोशल मीडियाचा काम माझ्या पद्धतीने सुरू केला.
मी कामावर परत येत नाही हे समजल्याने वचपा काढण्यासाठी आमदार साहेबांनी सोशल मीडियावर रमेश अधिकारी यांची हेतू परस्पर व चिडून हकालपट्टी केली अशा बातम्या लावून बदनाम करण्याचा कटकारस्थान केला.
संघटनेच्या पदावरून हटवण्याचा आमदारांना कुठल्याच प्रकारचा अधिकार नाही हे आमदारांना माहित नाही हे हास्यास्पद आहे सोशल मीडियावर मी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात कोणतीही कृती केली नाही व मला आमदारांनी हकालपट्टी करावी हकालपट्टी करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त जिल्हाध्यक्षांनाच आहे ही बातमी माहीत होताच गडचिरोली चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी त्याच्या सोशल मीडिया प्रमुख पदावर नियुक्ती दिली त्याबद्दल खासदार अशोक भाऊ नेते यांचे आभार सोशल मीडिया गडचिरोली विधानसभेचे करण्यात अधिकार आमदार होळी यांना कोणी दिला? मी व माझ्या गडचिरोली विधानसभा संयोजक पदाचा राजीनामा स्वखुशीने देत आहे तसेही आमदार होळी यांचे कामावरून मी एक महिना अगोदर स्वतःच बंद झालो होतो त्यामुळे त्यांचा हकालपट्टी करण्याचा प्रश्न निर्माण होत नाही व आमदार होळी यांनी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांची हकालपट्टी सारखी उपाधी लावून बदनाम करणे हे एक आमदाराला शोभत नाही मी सोशल मीडियावर पसरलेल्या बातम्यांचा जाहीर निषेध करतो व त्यांनी टाकलेल्या बातम्यांचा खंडन करतो.

आजची पत्रकार परिषद ही सामंजस्याची पत्रकार परिषद आहे डॉक्टर देवराव होळी यांनी रमेश अधिकारी यांची जाहीर माफी मागावी अन्यथा विविध पत्रकार परिषदामधुन डॉक्टर होळी यांचे गुपित बाहेर काढू असे नगरसेवक आशिष पिपरे यांनी पत्रकार परिषदेतून माहिती दिली.

पत्रकार परिषदेला रमेश अधिकारी, आशिष पिपरे नगरसेवक तथा जिल्हा महामंत्री ,दिपक सातपुते, मुरली मंडल, सुबोध रॉय हे हजर होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button