नेरी शहरात तान्हा पोळा डिझेच्या तालावर ढोल ताश्याच्या गजरात धुमधडाक्यात साजरा
सर्व पक्षीय मित्र परीवाराची एकत्रीता हीच नेरी शहराची ओळख.
प्रतिनिधी नेरी-प्रवीन वाघे,(दि,२९ ऑगष्ट)
नेरी येथे बालगोपालाचा तान्हा पोळा मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला या निमित्ताने अनेक पारितोषिक वितरीत करून पोळा साजरा करण्यात आला .
दरवर्षी प्रमाने या वर्षी सुद्धा नेरी येथे तान्हा पोळा भरवण्यात आला छोट्या बालगोपालानी आपले नंदी सजावट करून पोळ्यात आणले.कोरोनाच्या संकटामुळे तब्बल दोन वर्षानतर हा पोळ्याचा आनंद डिझेच्या तालावर ढोल ताशाच्या गजरात साजरा करन्यात आला. पुर्वीपासुन चालत आलेल्या परंपरेनुसार नेरी ग्रामपंचायत सरपंच व त्या॓ची टीम या॓नी नदीबैलाची पुजा अर्पण करुन काही बक्षीसे सुद्धा देण्यात आले. त्यानिमित्ताने चिमुर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या कडून नंदी धारकांना नोटबुक देण्यात आले व स्कुल बॅग आनी 3 साईकल अश्या प्रकारचे पारितोषिक देण्यात आले. यावेळी उपस्थित कमलाकर लोनकर , दत्तु पिसे, ग्रामपंचायत सदस्य वसंता कामडी,डाॅ, श्यामाजी हटवादे, दीवाकर पीसे, संदीप पीसे,निखील पीसे, पिंटु खाटीक, रवी चुटे,वीलास पीसे राजु घोनमोडे, प्रवीण वाघे,आनी डाॅ, जगदीश पिसे या॓नी कार्यक्रमाची महत्वाची भुमीका बजावली, विशेष म्हनजे नेरी शहरात जात धर्म राजकारण बाजुला सारुन सर्व मित्रपरीवार कडुन या कार्यक्रमाच आयोजन केल होत. त्यामुळे नेरी शहरात नागरीका॓च्या मनात आनंद असल्याचे दिसुन येते. प्रत्येक वेळप्रस॓गी सर्व पक्षीय मीत्र परीवाराची असलेली एकत्रीता हीच नेरी शहराची ओळख आहे. या कार्यक्रमाला नेरी वासीय जनतेनी शेवटीपर्यत उत्कृष्ट प्रतीसाद दीला त्याचप्रमाने चिमुर पोलीस स्टेशन चे ठानेदार श्री मनोज गभने साहेब या॓नी आपल्या टीमचा नेरी शहरात चोख बंदोबस्त ठेवला त्याबद्दल जनतेचे व पोलीस टीमचे सर्व पक्षीय मित्रपरीवारातर्फै आभार मानले.