चिमुर तालुक्यातील आश्रम शाळा नवतळा येथे बैल पोळा उत्साहात साजरा
ढोल ताशाच्या गजरात शेतकरी बा॓धवानी शाळेमध्ये आपली बैलजोडी घेऊन उपस्थिती दर्शविली
प्रतेक सणाला चक्क शाळेमध्येच विविध कार्यक्रम साजरे होतात.
प्रतिनिधी चिमुर-प्रवीन वाघे, (दि,२७ ऑगष्ट)
चिमुर- आश्रम शाळा म्हटल की आदीवासी भागातील विद्यार्थी आपल घर परीवार सोडुन विद्यार्थी बाहेरगाला शिक्षन घेण्यासाठी येतात.कुठे गैरसोय तर कुठे सोय मात्र आपण गेल्या कित्येक दिवसापासुन बघत आहोत की श्री स्वामी समर्थ अनुदानित आदीवासी माध्यमीक आश्रम शाळा नवतळा ही शाळा सदैव फुलुन दिसतो या शाळेत शिक्षक वर्गच शाळेच्या नावाप्रमानेच स्वामी समर्थाच्या शिकवनिनुसार प्रत्येक विद्यार्थाला समान वागनुक देऊन स्वताच्या मुलासारखच जपतात हे आपल्याला प्रत्यक्षात बघावयास मिळत आहे.या शाळेच्या प्रत्येक विद्यार्थाच्या चेहऱ्या वरचा आनंद काही वेगळाच.या शाळेची शिस्तीत मस्ती अशी परंपरा आहे अस म्हणाला हरकत नाही. वर्षातील सन त्यव्हार आले की प्रतेक विद्यार्थीना आपल्या गावाकडची आठवन येते मात्र नवतळाच्या आदिवासी मुला-मुलींची निवासी आश्रमशाळा असून येथे नवनवीन उपक्रम केले जातात. आदिवासी दिनानिमित्त पारंपारिक वेशभूषेत गावातून प्रभातफेरी काढण्यात आली होती.

त्याचप्रमाणे कृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी चा कार्यक्रम सुद्धा मोठ्या जल्लोशाने घेण्यात आला होता तसेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना गावाकडची आठवण येऊ नये व त्यांना आपण आपल्या गावातच आहोत अशी भावना निर्माण करण्यासाठी असे शाखा प्रमुख श्री पुठ्ठावार सर यांच्या संकल्पनेतुन मुख्याध्यापक श्री सुधीर सुकारे सर या॓च्या मार्गदर्शनाखाली अशे विविध उपक्रम या शाळेमध्ये रबविले जातात.
त्याचप्रमाने पोळ्याच्या सणानिमित्त देखील गावातील बैलाच्या सहा जोडी ढोल ताशाच्या गजरात शाळेमध्ये शेतकरी बंधुना शाळेमध्ये आमंत्रीत करुन जणूकाही गावात बैलपोळा भरलेले आहे असे विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या हस्ते बैलांचे पूजन करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळाच उत्साह दिसून अनोखा ऊपप्रम राबविण्यात आला. अश्या या विविध कार्यक्रमाने विद्यार्थी व पालक वर्ग या॓च्या चेहेर्यावर आनंदाचे वातावरण दिसुन येत आहे. व नवतळा गावातील नागरीक आनंद व्यक्त करत या शाळेला अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या कार्यक्रमाला उपस्थित मुख्याध्यापक श्री सुधीर सुकारे यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते.