जाहिरात
नेरी

हरणी येथील बचत गटाच्या महिलांची सक्षमीकरणाकडे वाटचाल

आयसीआयसीआय फाउंडेशन च्या सहकार्याने अनेक उपक्रम राबवून महिला करीत आहेत उन्नती

Spread the love

सुरवातीला मशरूम व काळी हळद लागवड उपक्रमांनी केली सुरवात

प्रतिनिधी नेरी।-प्रवीन वाघे, (दि,२६ ऑगष्ट)

नेरीवरुन जवळ असलेल्या हरणी येथील बचत गटाच्या महिलांनी आयसीआयसीआय फाऊंडेशन च्या सहकार्याने मशरूम व्यवसाय व काळी हळद लागवड करून अनेक विविध उपक्रम राबवित महिला सक्षमीकरनाच्या आणि महिलांच्या विकासाकडे वाटचाल सुरू केली आहे.


तालुक्यातील हरणी हे छोटेसे गाव असून दत्तक गाव योजनेत आहे या गावात महिलांनी अनेक बचत गट स्थापन केले आहे या महिलांची प्रगती व्हावी यासाठी आयसीआयसीआय फाउंडेशन च्या डेव्हलपमेंट अधिकारी रिता हटवार मॅडम यांनी गावातील महिलांना विविध उपक्रमांची माहिती व प्रशिक्षिन देऊन महिलांची प्रगती व्यवसायातून कशी साकारली जाईल यावर भर देत मशरूम व्यवसाय व काळी हळद लागवड व्यवसाय सुरू केले सदर दोन्ही व्यवसायाला विदर्भात व राज्यात प्रचंड मागणी असून दोन्ही पिके ही औषयीयुक्त असल्यामुळे चांगल्या प्रकारे नियोजन करून घेतले तर नक्कीच महिलांची प्रगती होऊन सक्षमीकरण होणार असा आशावाद रिता हटवार यांनी बोलून दाखविला आहे.

सध्या दोन्ही प्रकारची लागवड चांगल्या प्रकारे झाली असून भरघोस उत्पादन होणार आहे सदर पिकांच्या लागवडीबाबत तसेच त्यावर रोगावर उपाययोजना करण्यासाठी कृषी सहाययक अमित रंदये यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले या महिलांच्या व्यवसायाची प्रगती व्हावी म्हणून आयसीआयसीआय फाऊंडेशन चे सिएफ पत्रु मसराम यांनी मोलाची मदत केली या महिलांचा वाढता प्रतिसाद बघून अनेक व्यवसाय राबवून महिलांची प्रगती करून महिलां सक्षमीकरण करण्याचा निर्धार आयसीआयसीआय फाउंडेशन केला आहे .

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button