गडचिरोली
लाकडी नंदी बैलानी सजली बाजारपेठ
गडचिरोली(दि,२५ ऑगष्ट)
मागील दोन वर्षात कोरोना संसर्गाने तान्हा पोळा हा उत्सव जनतेला साजरा करता आला नाही. पण या वर्षी महाराष्ट्र शासनाने सर्व सण व उत्सवा वरील बंदी हटविल्याने यंदा सर्व सण जोरदार साजरी होत आहेत.

त्याचीच फलश्रुती गडचिरोली शहरातील रस्त्याच्या चारही बाजूला लाकडापासून बनवलेले नंदीबैल खूप मोठ्या प्रमाणात विक्रीकरिता उपलब्ध असल्याचे चित्र शहरात दिसत आहे.

आरमोरी व वडसा तालुक्यातील कलाकारांनी लाकडापासून बनवलेले नंदी विक्रीकरिता आणले आहेत त्या नंदी बैलांच्या सर्वसाधारण किमती एक हजार, दोन हजार,पाच हजार,दहा हजार, विस हजार आहेत व त्यांना आकर्षक रंग सुद्धा देण्यात आला आहे त्यामुळे त्या आकर्षक नंदी बैलांना घेण्याकरिता शहरातील जनतेची गर्दी वाढली आहे.

जाहिरात
