गडचिरोली (दि,५ जुलै)
जिल्हा परिषद, पंचायत समित्या व गडचिरोली वडसा नगरपरिषदेची मुदत मार्च महिन्यात संपली असून, प्रशासकाच्या माध्यमातून कामकाज सुरू आहे.
सद्या राज्यात भाजप आणि शिवसेना बंडखोर गटाचे सरकार स्थापन झाल्यामुळे शासनाकडून मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
त्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या उमेदवारी साठी चाचपणी सुरू झाली असून,
सदर निवडणूका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता लक्ष्यात घेता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मा.नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशानुसार काँग्रेसने उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. इच्छुकांनी निवडणूक अर्जाचा नमुना काँग्रेस कार्यालयातून घेण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केले आहे.
जाहिरात
