जाहिरात
गंगाखेड

मस्के परिवाराच्या वतीने भाद्रपद पौर्णिमा मोठा उत्साहात साजरी

Spread the love

गंगाखेड प्रतिनिधी (दि,११ सप्टेंबर)

महात्मा फुले नगरामधील धम्म उपासिका पद्मिनीबाई मधुकर मस्के व मस्के परिवाराच्या वतीने भाद्रपद पौर्णिमेचे निमित्त साधून बौद्ध धम्माच्या अत्यंत महत्त्वाचा असा समजला जानारा सन म्हणजे पोर्णिमा होय.या पौर्णिमेच्या निमित्त साधून सर्व महिला मंडळांनी पांढरे शुभ साडी, वस्त्र परिधान करून धम्म वंदना, त्रिशरण व पंचशील घेऊन पौर्णिमेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.


यावेळेस बौध्दाचार्य नवनाथ साळवे, बौध्दाचार्य, सखाराम पंडीत,बौध्दाचार्य रमेश जोंधळे यांनी धम्मदेशना देत सूत्र पठण करण्यात आले.
या कार्यक्रमाला महात्मा फुले नगर मधील महिला मंडळाने मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला मंडळाचे अध्यक्षा भागुबाई गायकवाड, अंतीकाबाई साबणे, अंतिकाबाई हेंडगे, जयश्रीताई घोबाळे,शिलाताई कांबळे, छबुबाई मस्के ,सुनंदाबाई सूर्यवंशी, दैवशाला शिंगारे, हनवते ताई, धारुताई, शिरसागर ताई, सुनंदा कांबळे, आशाताई हत्तीअंबिरे, व महिला मंडळातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने बालक बालिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button