जाहिरात
चिमुर

सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा केन्द्र प्रमुख यांचा सपत्नीक सत्कार समारंभ व वाढदिवस कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोटेगांव येथे साजरा

Spread the love

चिमुर प्रतीनीधी-प्रवीन वाघे,
मो,7038115037

नेरी येथुन जवळच असलेल्या चिमुर तालुक्यातील मौजा मोटेगांव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक १/०८/२०२२ रोज सोमवार ला प्राथमिक शाळा मोटेगांव येथील पटांगणात आदरणीय श्री सुभाषराव टि. कामडी सर हे शिक्षण सेवेतून निवृत्त झाले.त्याप्रित्यर्थ त्यांचा सपत्नीक शाल श्रिफळ व साडी देऊन सत्कार समारंभ व वाढदिवस कार्यक्रम साजरा करण्यात आला..
या कार्यक्रमाची सुरुवात महान विभुतीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.दशरथ दडमल प्रमुख पाहुणे म्हणून गावातील प्रथम नागरिक सरपंच श्री सुभाषजी नेवारे व उपसरपंच श्री. चंदु जी रामटेके विशेष अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री अनिल भोयर , घनश्याम ईंगुलकर सदानंद सुकारे,भक्तराम बावणे,सौ.ऊषा खेळकर, सौ . ऊर्मिला जांभुळे व इतर सदस्य गण.. उपस्थित होते..या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नवनियुक्त मुख्याध्यापक आदरणीय श्री संगमवार सर यांनी केले.तर आभार प्रदर्शन सौ.पिदुरकर मॅडम यांनी केले.सत्कारमुर्ती आदरणीय श्री कामडी सर यांनी आपल्या जीवनातील काही आठवणींना उजाळा देत या गावाबद्दल व शाळेबद्दल अतिशय उपयुक्त अशी माहिती दिली.व विद्यार्थ्यांना सुद्धा अतिशय मोलाचे मार्गदर्शन आपल्या मार्गदर्शनातुन त्यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ. जिवतोडे मॅडम आणि सौ.बावणे मॅडम यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता पसायदान घेऊन विद्यार्थ्यांना अल्पोहार देऊन करण्यात आली.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button